दिल्लीतील इंडिया गेटवर 61395 मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींची नावे आहेत का?

False आंतरराष्ट्रीय | International सामाजिक

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिल्लीस्थित इंडिया गेटवर मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींची 61395 नावे लिहिली आहेत असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह 

सत्य पडताळणी 

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दिल्ली के इंडियागेटपर कुल 95300 स्वतंत्रता सेनानियों के नाम है जिनमे मुसलमान – 61395, सिख – 8050, पिछडे – 14480, दलित – 10777, सवर्ण – 598, संघी – 00 असं लिहिण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील इंडिया गेटचा फोटो देण्यात आले आहे. 

याविषयी सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर सर्वात प्रथम इंडिया गेट असं सर्च केले. त्यानंतर इंडिया गेट या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आम्ही माहिती शोधली. या माहितीच्या आधारे इंडियागेटवर एकूण 70000 (70 हजार) शहीदांची नावे आहेत. यामध्ये पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ब्रिटिश इंडियन आर्मीमधील भारतीय शहीदांची आहेत, तर काही नावे 1919 मध्ये झालेल्या अफगाण युद्धातील शहीद झालेल्या भारतीय सैनिकांची आहेत. दिल्ली गेटवर ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होवून भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींची नावे लिहिलेली नाहीत. 

दिल्ली टुरिझमअर्काईव्ह 

इंडिया गेटवर पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धात शहीद झालेल्या ब्रिटिश आर्मीमध्ये असणारी भारतीय सैनिकांची नावे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जाती-भेदानुसार नावे लिहिण्यात आलेले नाहीत. या स्मारकावर 1917 मध्ये झालेल्या अफगाण युद्धातील शहीद महिला परिचारिकांची नावे देखील आहेत. हे इंडिया गेटवर इंग्रजी अक्षरात लिहिलेले आहे.

कल्चरल इंडियाअर्काईव्ह

इंडिया गेट स्मारकावर भारतीय शहीदांसोबतच, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या देशातील शहीदांची नावे देखील आहेत. याविषयीची माहिती कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हस कमिशन या वेबसाईटवर नावासहित दिली आहे. 

निष्कर्ष :  इंडिया गेट या भारतीय राष्ट्रीय स्मारकावर 61395 मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची नावे नसून, पहिल्या महायुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांची आणि इतर देशातील शहिद सैनिकांची नावे लिहिलेली आहेत. त्यामुळे व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा इंडिया गेटवर 61395 मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची नावे आहेत ही पोस्ट असत्य आहे. 

Avatar

Title:दिल्लीतील इंडिया गेटवर 61395 मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींची नावे आहेत का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False