FACT CHECK: लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला का?

Mixture आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

लंडनमधील न्यायालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन नाकारल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रांनी दिली. 26 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळत वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदीला 24 मेपर्यंत कोठडी दिली, असे बातमीत म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ बातमी येथे वाचा – दिव्य मराठीअर्काइव्ह

सोशल मीडियावरदेखील ही बातमी शेयर करण्यात आली होती.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 19 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याचे 20 मार्च आणि 29 मार्च असे दोन वेळेस जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.

यासंबंधी इंटरनेटवर शोध घेतला असता असे समोर आले की, नीरव मोदीने 26 एप्रिलच्या सुनावणी दरम्यान जामीनासाठी अर्जच केला नव्हता. हिंदुस्थान टाईम्स आणि द हिंदू वेबसाईटवरील 26 एप्रिलच्या बातमीनुसार, नीरव मोदीच्या वकिलांनी शुक्रवारी वेस्टमिंस्टर्स कोर्टात जामीन अर्ज दाखल नाही. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले. या सुनावणीत तो वँडसवर्थ कारागृहातून व्हिडिओलिंकद्वारे हजर झाला होता.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्हद हिंदूअर्काइव्ह

जर नीरव मोदीने जामीन अर्ज केला नव्हता, तर शुक्रवारची सुनावणी कशाबद्दल होती?

इकोनॉमिक टाईम्सने 25 एप्रिल रोजी दिलेल्या बातमीत म्हटले की, 29 मार्चला सुनावलेल्या कोठडीला 28 दिवस पूर्ण झाल्यामुळे नीरव मोदीला कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून 26 एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्यात येईल. मोदीला भारतात आणण्यासाठी भारताची बाजू मांडणाऱ्या क्राऊन प्रोसिक्यूशन सर्विसने जामिन फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात नीरव मोदी इंग्लंडच्या उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु, 25 एप्रिलपर्यंत नीरव मोदीने तसा कोणताही अर्ज केलेला नव्हता.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्स

म्हणजे 26 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत नीरव मोदीने जामीनसाठी अर्ज केला नव्हता.

पीटीआय आणि हिंदुस्थान टाईम्सने 5 मे रोजी दिलेल्या बातमीनुसार, नीरव मोदी 8 मे रोजी तिसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज दाखल करणार आहे. इंग्लंडमधील कायद्यानुसार, परिस्थितीमध्ये काही लक्षणीय बदल अथवा नवे पुरवे समोर आल्यावरच नीरव मोदी पुन्हा जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतो. क्राऊन प्रोसिक्यूशन सर्विसने सांगितले की, नीरव मोदीचे आधीचे दोन्ही अर्ज फेटाळल्या गेले असल्याने परिस्थितीमध्ये बदल झालेला दाखविल्यानंतर न्यायालय त्याच्या तिसऱ्या जामीन अर्जाचा विचार करेल.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

पीटीआयच्या बातमीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, 26 एप्रिलच्या सुनावणीत नीरव मोदीने जामीन अर्ज केला नव्हता. जामीन दिल्यास तो फरार होण्याचा धोका असल्याचे मान्य करीत कोर्टाने 29 मार्चला जामीन नाकारला होता. त्यामुळे तो 8 मे रोजी तिसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे.

मूळ बातमी येथे वाचा – पीटीआयअर्काइव्ह

यावरून हे सिद्ध होते की, नीरव मोदीने 7 मे 2019 पर्यंत तिसरा जामीन अर्ज केलेला नाही.

निष्कर्ष

लंडनच्या कोर्टातील 26 एप्रिलच्या सुनावनीत नीरव मोदीने जामीन अर्ज दाखल केलाच नव्हता. ती सुनावणी केवळ कायदेशीर प्रक्रियेचा भाग होती. नीरव मोदी 8 मे रोजी जामीन अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 एप्रिल रोजी त्याचा तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची बातमी अर्धसत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture