सत्य पडताळणी : कॉंग्रेस कार्यकर्त्याने बुरखा घालून केले मतदान

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. बुरखा पहनकर शमीना के नाम से कोंग्रेस को फर्जी वोट देते हुए पकडा गया कोंग्रेसी कार्यकर्ता… असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट 13 हजार जणांनी शेअर केली आहे. सात हजार सातशेहून जास्त लाईक्स या पोस्टला आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह  

तथ्य पडताळणी

हा फोटो नेमका कधीचा आहे याचा आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता याबाबत इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळाने 4 ऑक्टोबर 2015 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात एका फेसबुक पोस्टच्या आधारे ही व्यक्ती आरएसएसशी संबंधित असाव्यात असा दावा करण्यात आला आहे. याचे मूळ ट्विट डिलिट करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अक्राईव्ह

scoopwhoop.com या संकेतस्थळानेही एक ऑक्टोबर 2015 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. या संकेतस्थळानेही फेसबुक पोस्टचा आधार घेत ही व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या युवकाने प्रयत्न केल्याचा आरोप या युवकावर असल्याचेही या पोस्टमधील माहितीच्या आधारे या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

सोशल मीडियावर 2019 लोकसभा निवडणूकीत वेगवेगळ्या पध्दतीने फिरविण्यात येत असल्याचे आपण खाली पाहू शकता. हेच छायाचित्र 2015 मध्येही सर्वत्र फिरत होते हे सुध्दा आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

बुरखा घालून शमिना नावाने काँग्रेससाठी मतदान केल्याचे युवकाचे छायाचित्र हे 2015 चे असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळून आले आहे. म्हणजेच हे छायाचित्र 2019 च्या लोकसभा निवडणूकीदरम्यानच्या मतदानाचे नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोला तथ्य पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : कॉंग्रेस कार्यकर्त्याने बुरखा घालून केले मतदान

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False