सत्य पडताळणी : तुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील

Mixture/अर्धसत्य राष्ट्रीय

भारतीय भूदल वायुदल किंवा नौसेना मधील जवान जर कर्तव्य बजावताना मृत्यू पावले तर त्यांना शहीद दर्जा दिला जातो, या तीनही सेना रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतात, असे वृत्त www.inmarathi.com या संकेतस्थळाने दिले आहे. याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेन्डोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

फेसबुकवरील ईन मराठीच्या या पोस्टला 4 हजार लाईक्स आहेत. ही पोस्ट 357 जणांनी शेअर केली आहे. या पोस्टवर 64 कमेंट्स आल्या आहेत.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

 इकोनॉमिक टाइम्स ने याबाबत 11 जानेवारी 2018 रोजी एक वृत्त दिले आहे. या बातमीतील सारांश आम्ही खाली थोडक्यात देत आहोत.

1 अॅडव्होकेट अभिषेक चौधरी व हर्ष आहूजा यांनी अर्धसैनिक दलातील जवानांना शहीदाचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संरक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे यावर आपली भूमिका मांडली.

2 या प्रतिज्ञापत्रात कोणतेही कर्तव्य बजावताना जवानाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदाचा दर्जा देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सुरक्षा दलांना ही बाब लागू होते.

3 प्रतिज्ञापत्रात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले की यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने आणि गृह मंत्रालयाने अद्यापही कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

ARCHIVE ET | ARCHIVE MoD | ARCHIVE MHA | ARCHIVE PARAMILITARY

केंद्र सरकारने याबाबत संसदेत काय माहिती दिली हे देखील आपण पाहणार आहोत. इंडिया टुडे याबाबतचे वृत्त 6 डिसेंबर 2016 रोजी प्रसिध्द केले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

1 युध्दा दरम्यान भारतीय सशस्त्र दलातील कोणत्याही जवानाचा मृत्यू झाला तर त्याला शहीद असे म्हणण्यात येत नाही.

2 याच पध्दतीने अर्धसैनिक दलातील कोणत्याही जवानाचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्यास त्याला शहीद असे म्हणण्यात येत नाही.

ARCHIVE INDIA TODAY | ARCHIVE RIJIJU WIKI

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांनी 22 डिसेंबर 2015 रोजी लोकसभेत या विषयावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना वरील उत्तर दिले. हे उत्तर नंतर पत्र सूचना कार्यालयानेही एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जारी केले.  

आता आपण पाहू यात www.inmarathi.com या संकेतस्थळाने याबाबत काय म्हटले आहे.

इन मराठीने दोन गोष्टी प्रामुख्याने म्हटल्या आहेत.

1

C:\Users\Fact1\Downloads\inmarathi.com-2.png

2 भारतीय भूदल वायुदल किंवा नौसेना मधील जवान जर कर्तव्य बजावताना मृत्यू पावले तर त्यांना शहीद दर्जा दिला जातो.

निष्कर्ष

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानांना शहीद दर्जा देण्यात येणार नाही हे सत्य आहे. भारतीय भूदल वायुदल किंवा नौसेना मधील जवान जर कर्तव्य बजावताना मृत्यू पावले तर त्यांना शहीद दर्जा दिला जातो हे मात्र असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत हे वृत्त अर्धसत्य सांगणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : तुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture