तथ्य पडताळणी : वंचित बहुजन आघाडीला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे का?

False राजकीय | Political

(फोटो सौजन्य : माय महानगर)

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तिसरा मोठा पक्ष म्हणून उभा ठाकला आहे. एक आनंदाची बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीने राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे, असा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

वंचित बहुजन आघाडीने राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे का? याचा शोध घेताना सर्वप्रथम आम्ही त्यासाठी काय नियम आहेत ते शोधून काढले.

अक्राईव्ह

त्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीला किती टक्के मते मिळाली याचा शोध घेतला. त्यावेळी टीव्ही 9 मराठीने दिलेल्या एका वृत्तानुसार वंचित बहुजन आघाडीला जवळपास 14 टक्के मते मिळाली आहेत.

अक्राईव्ह

निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही.

अक्राईव्ह

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्याशी आम्ही याबाबत संपर्क साधला असता त्यांनी वंचित बहुजन आघाडीला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली नसल्याचे सांगितले.

निष्कर्ष

वंचित बहुजन आघाडीला राज्य पक्ष म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टमधील ही बाब असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : वंचित बहुजन आघाडीला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False