
अमेरिकेतील एका वृध्द दाम्पत्याने 62 वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोटासाठी न्यायालयाची दारं ठोठावली आहेत. पतीने बहिरा असल्याचे ढोंग केल्याने महिलेने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. एबीपी माझाने 7 मार्च 2019 रोजी दुपारी 03 वाजून 56 मिनिटांनी ही बातमी अपडेट केलेली आहे.
तथ्य पडताळणी
punchng.com या संकेतस्थळावरही हे वृत्त 9 मार्च 2019 रोजी प्रसिध्द झालेले आहे. या वृत्तातही पतीने बहिरा असल्याचे ढोंग केल्याने म्हटले आहे.

World News Daily Report या संकेतस्थळावर ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा 4 मार्च 2019 रोजी रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी प्रसिध्द झाली आहे.
या बातमीला World News Daily Report च्या फेसबुक पेजवर 621 लाईक असून 4 हजार 765 शेअर आहेत.
World News Daily Report ने आपल्या संकेतस्थळावर आपण अशा स्वरुपाच्या बातम्या या केवळ विनोदनिर्मितीसाठी करत असल्याचा उल्लेखही केला आहे.

एबीपी माझा आणि World News Daily Report या दोन्ही संकेतस्थळांनी बातमीत वापरलेला फोटो हा palmbeachpost.com या संकेतस्थळावरील एका बातमीचा आहे.
निष्कर्ष :
World News Daily Report या संकेतस्थळाने केवळ विनोदनिर्मितीसाठी हे वृत्त प्रकाशित केले होते. एबीपी माझाने मात्र हे वृत्त देताना असा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोने केलेल्या तथ्य पडताळणीत हे वृत्त खोटे असल्याचे आढळून आले आहे.

Title:सत्य पडताळणी: बायकोची बडबड टाळण्यासाठी पतीकडून 62 वर्षं मूकबधीर असल्याचं सोंग
Fact Check By: Dattatray GholapResult: False
