रवी पार्थसारथी लंडनमध्ये 91 हजार कोटी घेवून पळून गेला का?

Mixture अर्थव्यवस्था

संग्रहित छायाचित्र – सौजन्य – ईंडिया टुडे

सध्या सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रवी पार्थसारथी हे 91 हजार कोटी रुपये घेवून लंडनला पळून गेला असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टसंदर्भात केलेली सत्य पडताळणी

फेसबुकअर्काईव्ह

पोस्टमध्ये रवी पार्थसारथी यांचा फोटो देण्यात आलेला असून, त्या फोटोसोबत नरेंद्र मोदीजी का एक और वफादार रवि पार्थसारथी बॅंको का 91 हजार करोड लेकर लन्दन भागा असे लिहिलेले आहे.

सत्य पडताळणी

रवी पार्थसारथी कोण आहेत? त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने गुगलवर शोध घेतला. त्यानंतर असे समोर आले आहे की, रवी पार्थसारथी यांच्यावर 91 हजार कोटी मनी लाँडरिंग घोटाळ्यासंदर्भात आरोपपत्र आणि एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.

Money Control l  अर्काईव्ह

अमर उजालाअर्काईव्ह  (21 फेब्रुवारी 2019)

आयएलएंडएफएस या कार्यालयाचे माजी डायरेक्टर रवी पार्थ सारथी यांच्यावर मनी लाँडरिंग संदर्भात एफआयआर दाखल केला आहे. या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2019 ला ट्विट अपलोड केलेले आहे. या ट्विटच्या आधारे मुंबई येथे ईडीने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

अर्काईव्ह

रवी पार्थसारथी यांच्या विषयी लंडनला जाण्यासंदर्भात माहिती शोधली. रवी पार्थसारथी यांनी घशाच्या कॅंन्सरसाठी उपचार घेण्यासाठी लंडनला जाण्याची परवानगीसाठी सरकारकडे अर्ज केल्याचे समोर आले आहे. 22 ऑक्टोबरला रवी पार्थसारथी हे चौकशीसाठी भारतात आल्याचा उल्लेख बातमीमध्ये आढळतो. त्यापुर्वी रवी पार्थसारथी हे लंडनमध्येच घशाच्या कॅंन्सरसाठी उपचार घेत होते असे आढळून आले आहे. हे वृत्त 27 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

FINANCIAL EXPRESS l अर्काईव्ह

पोस्टमध्ये रवी पार्थसारथी हे 91 हजार कोटी घेवून लंडनला निघून गेल्याचे म्हटले आहे. बिझनेस स्टॅंडर्ड या वेबसाईटवर रवी पार्थसारथी त्यांच्या कामाच्या बाबतीत किती स्पष्ट होते. त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती याविषयी माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे रवी पार्थसारथी हे आयएलएंडएफएस या कार्यालयाचे 1989 पासून मुख्य कार्याधिकारी म्हणून काम पाहत होते. आयएलएंडएफएस या समुहाची प्रगती आणि वृद्धी करण्यामागे रवी पार्थसारथी यांचा खुप मोठा सहभाग आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्याने रवी पार्थसारथी यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी त्यांनी रवी पार्थसारथी यांना वित्तीय सेवा क्षेत्रात कामाचा अनुभव आणि दूरदृष्टी होती असे सांगितले आहे. पण असे असुनही रवी पार्थसारथी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आरोग्याच्या तक्रारीच्या कारणाने अचानक दिला हे संशोधनाअंती समोर आले आहे. आयएलएंडएफएस कंपनीवर असणाऱ्या कर्जाचा डोंगर आणि अंतर्गत आव्हान यामुळे ते अनेक समस्यांचा सामना करत होते. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

बिझनेस स्टॅंडर्डअर्काईव्ह

  • संपुर्ण संशोधनाअंती रवी पार्थसारथी यांच्यावर 91 हजार कोटी मनी लाँडरिंगसाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतू हे प्रकरण न्यायालयाच्या अंतर्गत न्यायप्रविष्ट असल्याने, त्यांनी 91 हजार कोटी घेतले हे सिद्ध झालेले नाही.  
  • रवी पार्थसारथी यांनी लंडनला घशाच्या कॅंन्सरच्या उपचारासाठी जाण्यासाठी स्वतः सरकारकडे अर्ज केल्याचे समोर आले आहे.
  • रवी पार्थसारथी यांनी आयएलएंडएफएस कंपनीच्या पदावरुन राजीनामा दिला आहे.
  • मुंबई स्थित आयएलएंडएफएस कंपनीच्या कार्यालयात फोनवर रवी पार्थसारथी यांच्याविषयी माहिती मिळवली असता, मुंबईतील कंपनीचे जनसंपर्क अधिकारी कृष्णा चैतन्य यांनी रवी पार्थसारथी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे रवी पार्थसारथी यांच्याबद्दल कंपनीकडे सद्य परिस्थितीत माहिती उपलब्ध नाही असे कृष्णा यांनी म्हटले आहे.

कृष्णा चैतन्य,
आयएलएंडएफएस कंपनी,
मुंबई कार्यालय, मुंबई.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये रवी पार्थसारथी हे 91 हजार कोटी रुपये घेवून लंडनला पळून गेला असा दावा करण्यात आला आहे. संशोधनाअंती रवी पार्थसारथी यांच्यावर 91 हजार कोटी रुपयांसाठी मनी लाँडरींगसाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे हे सत्य आहे. परंतू ते 91 हजार कोटी रुपये घेवून लंडनला गेला हे तथ्य खोटे आहे. त्यामुळे पोस्टमधील मजकूर संमिश्र आहे.

Avatar

Title:रवी पार्थसारथी लंडनमध्ये 91 हजार कोटी घेवून पळून गेला का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture