रणजितसिंह मोहिते पाटील यांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन : सत्य पडताळणी

Mixture/अर्धसत्य राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमधील व्हिडिओत भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे स्टेजवरुन बोलत असताना येत्या 23 तारखेला घड्याळाला मतदान करा असे आवाहन करताना दिसत आहेत. ही पोस्ट फेसबुकवरुन (रायगड माझा) व्हायरल झाली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाषणात बोलताना घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे. पोस्टमध्ये एक युट्युब लिंक देण्यात आली असून, या लिंकवर क्लिक केल्यानंतर रणजितसिंह पाटील यांचा प्रचारसभेचा एक व्हिडिओ दिसतो. युट्युबवर हा व्हिडिओ बारामती झटका या चॅनलवर 13 एप्रिल 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

अर्काईव्ह

फेसबुकवर इतरही पेजवर ही पोस्ट व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील व्हिडिओबद्दल रणजितसिंह मोहिते पाटलांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन असे हेडलाईन देण्यात आले आहे. या व्हिडिओबद्दल सत्य जाणण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर रणजितसिंह मोहिते पाटलांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन असे सर्च केले. या संदर्भात विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

लोकमत न्यूज 18अर्काईव्ह

पोलिसनामाअर्काईव्ह

डेलीहंटअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा माढा मतदारसंघातील सांगोला येथील आहे. या मतदार संघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलताना चुकून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाला मतदान करा असे म्हटले होते. परंतू त्याच्या पुढच्याच क्षणी त्यांनी हात जोडत उपस्थितांची माफी मागत चुकून तोंडातून निघाले (स्लीप ऑफ टंग) असे म्हणत आपली चुक दुरुस्त केली. परंतू या सर्व घटना-घडामोडीत स्वतः आपली चुक झाली म्हणून मिश्किल हसले आणि उपस्थितांमध्येही काही सेकंदासाठी हशा पिकला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच जनतेची आणि उपस्थितांची हात जोडून माफी मागत चुकून तोंडातून शब्द निघाले असे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येच दिले आहे.

लोकमत न्यूज 18अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील व्हिडिओ संदर्भातील सत्य आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कडून बोलताना झालेले स्लीप ऑफ टंग याबद्दल विविध वृत्तवाहिन्यांवर बातमी प्रसिद्ध झाली आहे. युट्युबवर रायगड माझा या चॅनलने 14 एप्रिल 2019 रोजी व्हिडिओ अपलोड केला आहे.

अर्काईव्ह

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुळ भाषणाचा व्हिडिओ माढा मतदारसंघातील सांगोला येथील आहे. त्या व्हिडिओमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाला मतदान करा असे स्लीप ऑफ टंग झाल्यानंतर लगेचच हात जोडत उपस्थितांची कशी माफी मागितली आणि स्वतःची चुक पुढच्या वाक्यात बोलताना कशी दुरुस्त केली हे आपण पाहू शकता. याबद्दल युट्युबवर राजे भोसले फाउंडेशन या युट्युब चॅनलवर 13 एप्रिल 2019 ला अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये 7:30 मिनिटांपासून ते 9:05 मिनिटांपर्यंत पाहू शकता.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे. परंतू संपुर्ण संशोधनानंतर फॅक्ट क्रिसेंडोला असे आढळून आले आहे की, माढा मतदारसंघात भाजप प्रचार सभेमध्ये चुकून रणजितसिंह पाटील यांनी घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले. परंतू लगेचच हात जोडून माफी मागत पुढच्या वाक्यांमध्ये स्वतःच्या वाक्यातील चूक दुरूस्त करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये व्हिडिओबद्द्ल अर्धसत्य माहिती देण्यात आली आहे.

निष्कर्ष : रणजितसिंह मोहिते पाटलांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन या पोस्टच्या शीर्षकात अर्धसत्य माहिती देण्यात आली आहे. संपुर्ण व्हिडिओ पाहिला असता, ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Avatar

Title:रणजितसिंह मोहिते पाटील यांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture