तथ्य पडताळणी : राजीव गांधीचे योगदान सांगणारी ही पोस्ट किती सत्य?

Mixture/अर्धसत्य राजकीय | Political

5  वर्षात राजीव गांधीचे 5 योगदान असे म्हणणारी एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

शीख विरोधी दंगलीसाठी राजीव गांधी जबाबदार होते का? त्यांची यात नेमकी भूमिका काय होती हे तपासण्यासाठी आम्ही याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील नानावटी आयोगाचा अहवाल पाहिला. या अहवालात राजीव गांधी यांचा या दंगलीत कोणताही सहभाग दिसून येत नसल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

शीखविरोधी दंगलीत हजारो निर्दोषांची हत्या घडवून आणली या आरोपाबाबत शोध घेतला असता आम्हाला बीबीसी मराठीचे खालील वृत्त दिसून आले. जेव्हा मोठी झाडे पडतात तेव्हा धरणी हादरतेच, असे वक्तव्य राजीव गांधींनी केले होते, असे या वृत्तात म्हटले आहे. 

अक्राईव्ह

भोपाळ वायू दुर्घटनेबाबत आम्ही शोध घेतला असता आम्हाला पी. सी. अलेक्झांडर यांनी भोपाळ वायूगळती दुर्घटनेला जबाबदार युनियन कार्बाईड कंपनीचे तत्कालीन प्रमुख वॉरन अँडरसन यांना पळून जाण्यासाठी मदत करण्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचाही सहभाग असू शकतो, असे विधान केले होते. या प्रकरणात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे जयंती नटराजन यांनी म्हटले होते. याबाबतचे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाईम्सने 12 जून 2010 रोजी दिले होते.

अक्राईव्ह

तिहेरी तलाखच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय राजीव गांधींनी बदलल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याबाबतचा शोध घेत असताना आम्हाला शाहबानो प्रकरणाबाबतची एनडीटीव्ही इंडियाची एक पोस्ट दिसून आली. या पोस्टमध्ये अतिशय स्पष्टपणे राजीव गांधी सरकार ने मुस्लिम महिलाओं को मिलने वाले मुआवजे को निरस्त करते हुए एक साल के भीतर मुस्लिम महिला (तलाक में संरक्षण का अधिकार) अधिनियम, (1986) पारित कर सुप्रीम कोर्ट के फैसले को पलट दिया, असे म्हटले आहे. राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला हा पोस्टकर्त्याचा दावा त्यामुळे सत्य दिसून येत आहे.

अक्राईव्ह

राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना श्रीलंकेत शांतीसेना पाठवली आणि यात 1200 जवान शहीद झाले असा दावा पोस्टकर्त्याने केला आहे. याची पडताळणी करताना आम्हाला बीबीसीचे या वृत्ताच्या शीर्षकात म्हटले आहे की, .. जब 1,200 भारतीय सैनिक ‘बेवजह मारे गए’ यातून दिसून येते की श्रीलंकेत शांतीसेनेचे 1200 जवान शहीद झाले होते. बीबीसी मराठीने याबाबत दिलेल्या एका वृत्तात या बाबी पुष्टी होत आहे.

अक्राईव्ह

राजीव गांधींनी बोफोर्स घोटाळ्यात देशाचा पैसा खाल्ला, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याविषयी शोध असताना आम्हाला दैनिक लोकसत्ताचे संपादकीय दिसून आले. यात स्पष्टपणे राजीव गांधी यांची सुमारे पाव शतकांच्या चारित्र्यहननानंतर लाचखोरी आरोपीतून सुटका झाल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

शीखविरोधी दंगलीत राजीव गांधीची कोणतीही भूमिका असल्याचे स्पष्ट होत नसल्याचे नानावटी आयोगाने म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा भोपाळ वायू दुर्घटनेशी दूरान्वयानेही संबंध नाही, असे जयंती नटराजन यांनी म्हटले होते. तिहेरी तलाख प्रकरणात (शाहबानो प्रकरणात) सुप्रीम कोर्टाचा निर्णय राजीव गांधी यांच्या सरकारने बदलला होता, ही बाब सत्य आहे. बोफोर्स प्रकरणातून राजीव गांधींची सूटका झाल्याचेही दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र म्हणजेच अर्धसत्य स्वरुपाची आढळून आली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : राजीव गांधीचे योगदान सांगणारी ही पोस्ट किती सत्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture