कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे.

फेसबुकअर्काईव्ह

हा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता.

फेसबुकअर्काईव्ह

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पोस्टमध्ये व्हिडिओमध्ये काही स्थानिक कलाकारांसोबत हातामध्ये छोटी डफ घेवून, डफच्या तालावर ठेका धरुन नृत्य करत डफ वाजवताना दिसत आहे. पोस्टमध्ये या व्हिडिओसंदर्भात राहुल गांधी लोकांचे मनोरंजन करताना असा दावा करण्यात आला आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने केले सत्य पडताळणी

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला व्हिडिओ कधीचा आहे?, कुठल्या स्थानिक कलाकारांसोबतचा आहे हे आम्ही गुगलवर सर्च केले. सदरील व्हायरल व्हिडिओ हा गुजरातमधील असून, हा व्हिडिओ ऑक्टोबर 2017 मधील आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 2017 मध्ये गुजरात दौऱ्यावर गेले असताना, चोट्टा उदेपूर जिल्ह्यातील एक आदिवासी पाड्यातील हा व्हिडिओ आहे. या संदर्भात वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Live mint l अर्काईव्ह

INDIA TODAY l अर्काईव्ह

तीन दिवसीय गुजरात दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी विविध आदिवासी भागाला भेट दिली. यावेळी गुजरात विकास मॉडेल, भारतीय जनता पक्ष, डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात राज्य निवडणूका या विषयी त्यांनी सभांमध्ये जनतेला संबोधून भाषणे केली. स्थानिक लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी या दौऱ्यामध्ये केला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2017 मध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर या दोन टप्प्यांमध्ये राज्य निवडणूका घेण्यात आलेल्या आहेत. त्यावेळी प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी आदिवासी लोकांसोबत एक सभेमध्ये स्थानिक कलाकारांसोबत ठेका धरलेला दिसून येतो. हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 10 आक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/917744378449248256

अर्काईव्ह

त्याचप्रमाणे कॉंग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर देखील हा व्हिडिओ 10 ऑक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

https://twitter.com/INCIndia/status/917756659987968000

अर्काईव्ह

युट्युबवर न्यूज स्टेट या युट्युब चॅनलवर राहुल गांधी यांचा स्थानिक कलाकारांसोबच नृत्य करतानाचा व्हिडिओ 10 आक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=EsKjNXniR4E

राहुल गांधी हे ऑक्टोबर 2017 मध्ये जेव्हा गुजरात दौऱ्यावर असताना लोकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. लोकांमध्ये विविध कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते. या दौऱ्याला कॉंग्रेस पक्षाने नवसर्जन यात्रा असे म्हटले आहे. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी एका सभेमध्ये स्थानिक लोकांसोबत काही क्षण ठेका धरत नृत्य केले होते. परंतू राहुल गांधी यांचा कोणताही मनोरंजनाचा उद्देश नसून, प्रचारादरम्यान स्थानिक लोकांसोबत स्वतःला कनेक्ट करत, काही क्षण त्यांनी वेळ घालवला होता. त्यामुळे जाणीवपुर्वक लोकसभा 2019 च्या अनुषंगाने राहुल गांधी यांचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल होत आहे.

निष्कर्ष : पोस्टमध्ये दाखविण्यात येणारा व्हिडिओ हा जुना आहे. 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रचारसभांसाठी गुजरात दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान स्थानिक कलाकारांसोबत ठेका धरत नृत्य केले होते. परंतू यामागे राहुल गांधी यांचा कोणताही लोकांचे मनोरंजन करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला व्हिडिओ सत्य असून, पोस्टसंदर्भात करण्यात आलेला मनोरंजनाचा दावा असत्य आहे. लोकसभा 2019 च्या अनुषंगाने जाणीवपूर्वक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे व्हायरल पोस्ट संमिश्र आहे.

Avatar

Title:राहुल गांधी लोकांचे मनोरंजन करतात का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale

Result: Mixture