
अमेरिकी डीएनए विशेषज्ञ का दावा आसाराम के बेटे है मोदी अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
डीएनए विशेषज्ञ डॉक्टर मार्टिन सिजो यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही डीएनए विशेषज्ञ डॉक्टर मार्टिन सिजो हे कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती आढळून आली नाही. या वृत्तपत्राच्या कात्रणात ही डीएनए चाचणी कधी आणि कुठे करण्यात आली याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. खाली वर्तुळ करण्यात आलेले शब्द हे या वृत्तपत्र कात्रणातील फॉन्टपेक्षा वेगळे वाटत आहेत. सर्वसामान्यपणे कोणत्याही वृत्तपत्रात असे दिसून येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाराम बापू यांचे संबंध नेमके कसे याचा शोध घेतला असता आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला. यातून स्पष्ट होते की नरेंद्र मोदी हे एकेकाळी आसाराम बापूंच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत होते.
दैनिक लोकसत्तानेही या व्हिडिओबद्दल एक वृत्त दिले असल्याचे दिसून आले.

एकेकाळी आसाराम बापूंशी नरेंद्र मोदींचे चांगले संबंध होते तरी भाजप नेत्यांनी आसाराम बापूंचा बचाव करु नये असे नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे म्हटले असल्याचे वृत्त firstpost.com ने दिल्याचे दिसून येते.

निष्कर्ष
नरेंद्र मोदी हे एकेकाळी आसाराम बापूंच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते. मोदींनी आसाराम बापूंचा कोणीही बचाव करु नये असे स्पष्टपणे म्हटले आहे. यापलिकडे नरेंद्र मोदी आणि आसाराम बापूंचा कोणताही संबंध असल्याचे दिसून येत नाही. ज्या वृत्तपत्राच्या कात्रणाच्या आधारे मोदींच्या डीएनएचा दावा करण्यात येत आहे. ते वृतपत्राचे कात्रण खोटे असून त्यात करण्यात आलेले दावेही फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळले आहेत.

Title:तथ्य पडताळणी : मोदींबाबत डीएनए तज्ञाचा दावा किती सत्य?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
