तथ्य पडताळणी : जावेद अख्तरांनी बुरख्याचे समर्थन केले आहे का?

False राजकीय | Political

बुरख्याचे समर्थन करणाऱ्या जावेद अख्तर यांच्या मुली अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

जावेद अख्तर यांनी बुरख्याबद्दल काय मत व्यक्त केले आहे, याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला जावेद अख्तर यांच्याबद्दल दैनिक महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात बुरख्याप्रमाणेच घुंगटवरही प्रतिबंध असावा, असे वक्तव्य अख्तर यांनी केल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

जावेद अख्तर यांनी बुरख्याबद्दल नेमकी काय भूमिका मांडली हे आपण खाली दिलेल्या CNN-News18 च्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 2 मे 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात बुरख्यावर बंदी घालाच पण त्याचबरोबर घुघटवरही बंदी घाला, अशी मागणी जावेद अख्तर यांनी केल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

जावेद अख्तर यांनी बुरख्यावर बंदी घालायची असेल तर घुघटवरही बंदी घाला, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी बुरख्याचे समर्थन केलेले नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : जावेद अख्तरांनी बुरख्याचे समर्थन केले आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False