तथ्य पडताळणी : पाकिस्तानात तोडफोड झालेल्या वास्तूचे नाव काय?

Mixture आंतरराष्ट्रीय | International

पाकिस्तानातील एका ऐतिहासिक गुरु नानक महालाचा काही भाग समाजकंटकांनी पाडल्याचा आल्याचा दावा समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तोडफोड झालेल्या वास्तूचे नाव गुरु नानक महाल आहे या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पाकिस्तानात अशी काय घटना घडली आहे का? पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे का? याची पडताळणी आम्ही डॉन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर जाऊन केली. त्यावेळी आम्हाला खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार अशी घटना झाल्याचे दिसून येत आहे. या वृत्तात ऐतिहासिक गुरु नानक महाल असा स्पष्ट उल्लेख यात दिसून येत आहे. स्थानिक याला ‘महलां’ असे म्हणत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

आम्ही आमचा शोध पुढे नेत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी याबाबत काय वृत्त प्रसिध्द केले आहे याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला हे वृत्त पाकिस्तानी नव्हे तर भारतीय वर्तमानपत्रांनी या वृत्ताच्या आधारे प्रसिध्द केल्याचे दिसून आले.

अक्राईव्ह

पाकिस्तान सरकारनेही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. नारोवाल जिल्ह्यात ही वास्तू असल्याचे सांगण्यात आल्याने आम्ही विकीपीडियावर याबाबत असलेली माहिती पाहिली. या माहितीत या वास्तूचा उल्लेख आढळून आला नाही. या ठिकाणच्या बाथनाथवाला गावाच्या नकाशातही असे नाव असलेली इमारत दिसून येत नाही.

आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला असता दैनिक लोकसत्ताने याबाबत प्रसिध्द केलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. यात ज्येष्ठ लेखक आणि इतिहासकार अमरदीप सिंह यांनी ही वास्तूला गुरू नानक देव यांचा महाल म्हणता येत नाही, असे स्पष्ट म्हटल्याचे दिसून येते.

अक्राईव्ह

निष्कर्ष

पाकिस्तानात तोडफोड झालेली वास्तूचे नाव गुरू नानक देव यांचा महाल असल्याचा उल्लेख आढळून येत नाही. नानक महाल म्हणजे रणजित सिंह यांच्या काळात उभारण्यात आलेले शीख समुदायातील एका कुटुंबीयाचे घर आहे. ती वास्तू उभारण्यासाठी बांधण्यात आलेल्या विटांवरून ते स्पष्ट होत असल्याचे इतिहास संशोधक अमरदीप सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या वास्तूचे हे नाव संमिश्र स्वरुपाचे आढळले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : पाकिस्तानात तोडफोड झालेल्या वास्तूचे नाव काय?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture