लोकसभा 2019 च्या निवडणूकीनंतर भाजप सत्तेत आल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूरमधून खासदार म्हणून निवडून आले. सोशल मीडियावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचा दाखला बोगस असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप घेत, जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला बोगस आहे असा दावा करण्यात आलेला आहे.

पोस्टसंदर्भात सत्य शोधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्च केले. त्यानंतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क केला.

  • त्यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “ज्यावेळी लोकसभा निवडणूकीसाठी भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अर्ज केला होता त्यावेळी त्यांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रांची सत्यता पडताळूनच पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्या अर्जाचा स्विकार केला. त्यानंतरही ज्या काही लोकांनी जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात आक्षेप नोंदवला होता, त्यावेळीच तो आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जेव्हा लोकसभा निवडणूकीसाठी एखादा उमेदवार अर्ज दाखल करतो त्या विरोधात केवळ निवडणूकीसाठी अर्ज करण्यात आलेला दुसरा उमेदवारच आक्षेप नोंदवू शकतो. या प्रकरणी त्यावेळीच जेव्हा भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणूकीसाठी अर्ज भरला त्यावेळीच जात प्रमाणपत्र सादर केले असल्यामुळे त्यांच्याबाबतीत तेव्हा ज्यांनी कोणी जातप्रमाणपत्रासाठी आक्षेप नोंदवला होता तो फेटाळण्यात आलेला आहे. तसेच सध्या या प्रकरणी कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही असे त्यांनी सांगितले.”

डॉ. राजेंद्र भोसले
निवडणूक निर्णय अधिकारी, सोलापूर.

  • त्याचप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष सोलापूर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला. तेव्हा त्याचे स्वीय सहायक शिवसिद्ध बुला यांनी आम्हांला सांगितले की, “ज्यावेळी लोकसभा निवडणूकीसाठी जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अर्ज दाखल केला होता, त्याचवेळी जात प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त केले होते. त्यावेळी अर्जाची छाननी झाल्यानंतरच त्यांचा अर्ज स्विकारण्यात आलेला आहे. त्यामुळे जातीचा बोगस दाखला ही बाब खोटी आहे.”

शिवसिद्ध बुला

स्वीय सहायक, खा.
जयसिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर.  

निष्कर्ष :  संपुर्ण संशोधनानंतर असे आढळून आले की, सोलापूर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या संदर्भात पोस्टमध्ये करण्यात आलेला बोगस जातीचा दाखला हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बोगस आहे का?

Fact Check By: Amruta Kale

Result: False