
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला जाण्यासाठी 500 रुपये फी लागते असा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अहमदाबादच्या एका हॉस्पिटल ने एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. . रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णास भेटायचे असेल तर प्रति व्यक्ती ५०० रूपये फी (Entry fee) घेतली जाते. . जमा होणारी फीची रक्कम रूग्णाच्या बिलातून वजा केली जाते . . . यामुळे दिखाव्यासाठी किंवा formality म्हणून येणा-या बघ्यांची गर्दी तर नियंत्रणात आलीच, पण रूग्णालाही आर्थिक मदत मिळायला लागली. . तसेच रूग्णाची खरे काळजी करणारे कोण आहेत? याचीही ओळख व्हायला लागली. . . असे म्हटले आहे.
या संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची फी घेतली जाते का हे सर्च केले.
पेशंटला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून कोणत्याही प्रकारची फीस घेतली जाते का याविषयी आम्हाला ट्विटरवर हरिष गोयंका यांनी 30 सप्टेंबर रोजी केलेले ट्विट आढळले. या ट्विटमध्ये त्यांनी अहमदाबाद येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यासाठी 50 रुपये फीस घेतली जाते असे त्यांनी म्हटले आहे.
याविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मुंबईच्या सोमय्या हॉस्टिटलमध्ये रुग्णाला भेटायला येणाऱ्या लोकांसाठी प्रत्येकी 20 रुपये चार्ज करण्यात येतात अशी बातमी मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे.
गुजरामध्ये अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे व्हिझिटर्स फी म्हणून 10 रुपये प्रत्येकी घेण्यात येतात. ही फी रुग्णाला भेटण्याच्या हॉस्पिटलकडून ठरलेल्या वेळा व्यतिरिक्त भेटायला येणाऱ्या लोकांसाठी घेण्यात येते.
गुजरात कॅन्सर हॉस्पिटल । अर्काईव्ह
गुजरातमधील अहमदाबाद येथील अपोलो हॉस्पिटलशी संपर्क केला असता, त्यांनी पेशंटला भेटायला येणाऱ्या लोकांकडून कोणतेही चार्जेस अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद घेत नाही असा खुलासा केला.
त्याचप्रमाणे इंडिअन मेडिकल असोसिएशनच्या नियमावलीमध्येही रुग्णाला भेटायला येणाऱ्या लोकांसाठी फी घेण्यात यावी अशा प्रकारचा कोणताही नियम आढळून येत नाही.
इंडियन मेडिकल असोसिएशन । अर्काईव्ह
सोशल मीडियावरील पोस्ट संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आमचे प्रतिनिधी फ्रॅनी यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी देखील अहमदाबाद येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी 500 रुपये फी घेतली जाते या दाव्याला नकार दिला आहे.
निष्कर्ष : संपुर्ण संशोधनानंतर अहमदाबाद येथे कोणत्याही नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला येणाऱ्या लोकांकडून 50 रुपयांपेक्षा जास्त फीस घेतली जाते असे आढळून येत नाही. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला अहमदाबाद येथे रुग्णाला भेटायला येणाऱ्या लोकांकडून 500 रुपये फीस घेतली जाते हा दावा असत्य आहे.

Title:अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला 500 रुपये फी लागते का?
Fact Check By: Amruta KaleResult: False
