
भारतात ईव्हीएम हा नेहमीच एक वादाचा विषया राहिलेला आहे. सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बैलेट पेपर नाव वाचून मतदान करतात, या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपरचे समर्थन करत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.
काय आहे दावा ?
या व्हिडिओमध्ये युजर्सने लिहिलेले आहे की, “स्वत: इतका विरोध करत होते, मग आता का नाही हटवत इव्हीएम, आधी स्वताच इव्हीएम हटवण्यासाठी प्रयत्न करत होते, आता सत्ता तुमच्या हातात आहे तर ईव्हीएमच्या बैलेट पेपर लागू करून द्या ना.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाल की, ही व्हिडिओ क्लिप उत्तर प्रदेशच्या न्यू मुरादाबाद शहरात 3 डिसेंबर 2016 रोजी पारपडलेल्या परिवर्तन रॅलीत सभेचा आहे.
या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील डिजिटालाइजेशनच्या फायद्या विषयी सांगत होते.
हा व्हिडिओ नरेंद्र मोदीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण भाषण पाहू शकतात.
वरील भाषण पाहिल्यावर कळते की, व्हिडिओमध्ये कुठे ही नरेंद्र मोदींनी बैलेट पेपरचे समर्थन केले नाही.
मुळ व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, “आपला फोनच आता आपले पाकीट आहे. जर आपले पैसे बॅंकमध्ये आसती तरीदेखील आपन फोनचा वापर करून पैसे खर्च करू शकतात. यासाठी सगळी व्यवस्था उपलब्ध आहे. आता आपल्याला एटीएममधून पैसे काढायची गरज नाही. लोक म्हणतात की, आपला देश गरीब व नागरिक अशिक्षित आहे, त्यांना काही समजत नाही. परंतु, या जगात शिक्षित देश पण निवडणुकीच्या वेळी बैलेट पेपरवर लिहिले नाव वाचतो आणि त्यावर शिंका लावतो, अमेरिका देखील असच करतो. परंतु भारत देश ज्यांना गरीब आणि अशिक्षित समजल जात, तो देश बटन दाबून आपले मतदान करतो.”
पुढे ते म्हणतात की, “भारताचे नागरिक नविन गोष्ट आत्मसात करण्यासाठी वेळ लावत नाही. जर सरळ मार्गाने नागरिकांना समजावले तर त्यांच्या लक्षात येईल. आजच नव्हे जर भविष्यादेखील काला पैसा थांबवायचा असेल तर डिजिटल व्यवहार करणे आवश्यक आहे.”
हे वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेली आहे. मूळ व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमचे समर्थन करत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपर समर्थन केले का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
