ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भगवान रामची प्रतिमा असलेले नाणे काढले नव्हते; फेक नाणे व्हायरल
अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका नाण्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जाता आहे की, भारतात ब्रिटिश राजवट काळात 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भगवान राम लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा असलेले 2 आण्याचे नाणे जारी केले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. हे नाणे फेक असून ईस्ट इंडिया कंपनीने असे कोणतेही नाणे जारी केले नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये नाण्याच्या दोन बाजू दाखवल्या आहेत. पहिल्या बाजूला भगवान राम लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा दिसते. दुसऱ्या बाजूला इंग्रजीत ‘ईस्ट इंडिया कंपनी’ व ‘यू.के’ लिहिलेले आहे. सोबत कमळचे फूल, ओमकारचे चिन्ह, दोन पणत्यांचे आणि इंग्रजीत 1818 व दोन नाणे असे लिहिलेले आहे.
युजर्स हा फोटोशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, "सन 1818 सालचे दोन आण्याचे नाणे, नाण्याच्या एका बाजूस राम आणि दुसऱ्या बाजूस कमळ म्हणजे 200 वर्षांपूर्वी इंग्रजांना पण माहीत होते की, भविष्यात राम मंदिर "कमळ" वालेच बांधतील."
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, व्हायरल नाणे फेक आहे.
स्मॉलेस्ट कॉइन कलेक्टर या ब्लॉगनुसार व्हायरल फोटोमधील नाणे फेक आहे. ब्रिटिशांनी कधीही भारतीय देवी-देवतांची प्रतीमा असलेले नाणे जारी केले नाही. भगवान रामची प्रतिमा असलेले नाणे फेक असून खालील फोटोमधील आण्याची स्पेलिंग चुकीची आहे.
इंग्रजीमध्ये ‘Aanna’ च्या जागी ‘Anna’ ही स्पेलिंग योग्य आहे.
आरबीआयच्या वेबसाईटला भेट दिल्यावर कळाल्यावर तेथे ब्रिटिश राजवट काळातील क्वीन व्हिक्टोरिया, विल्यम पाच आणि एडवर्ड सातवा नाणे आढळले. परंतु, या ठिकाणी भगवान रामची प्रतिमा असलेले कोणतेही नाणे आढळत नाही.
याबाबत राष्ट्रीय संग्रहालयाचे प्रवक्ते सनजीब सिंग यांनी इंडिया टूडेला सांगतात की, व्हायरल फोटोमधील नाणे फेक आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात देवी-देवतांची प्रतिमा असलेली नाणी होती. परंतु, ब्रिटिश राजवट काळात ईस्ट इंडिया कंपनीने भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा असलेले कोणतेही नाणे जारी केले नव्हते.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील नाणे फेक असून ईस्ट इंडिया कंपनीने भगवान राम किंवा कोणत्याही देवी-देवतांची प्रतिमा असलेली नाणी जारी केली नव्हती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भगवान रामची प्रतिमा असलेले नाणे काढले नव्हते; फेक नाणे व्हायरल
Written By: Sagar Rawate
Result: False