पत्नीच्या मृत्यूनंतर हे प्राध्यापक आपल्या बाळाला सांभाळत शिकवतात का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

एका लहान बाळाला कडेवर घेऊन वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे की, पत्नीच्या निधनानंतर हे प्राध्यापक बाळाला घेऊन वर्गात शिकवतात. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची सर्वत्र वाहवा होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या फोटोतील बाळ या प्राध्यापकाचे नाही आणि त्यांच्या पत्नीचे निधनही झालेले नाही.

काय आहे दावा?

बाळाला घेऊन शिकवणाऱ्या व्यक्तीचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “या प्राध्यापकांची पत्नी बाळाला जन्म देताना निधन पावली. मात्र ते ना खचले, ना त्यांनी हार मानली . ते त्यांची आपल्या बाळाप्रति आणि कॉलेज संबंधित कर्तव्य दोन्हीही एकाचवेळी चांगल्याप्रकारे निभावत आहेत. खऱ्या जीवनातील हिरोची कथा.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो मेक्सिकोमधील एका प्राध्यापकाचा आहे. 2016 साली हा फोटो व्हायरल झाला होता. 

स्पॅनिश भाषेतील न्यूजवेबसाईट El Comercio ने जुलै 2016 मध्ये प्रकाशित केलेल्या लेखानुसार, या प्राध्यापकाचे नाव Moisés Reyes Sandoval असून ते इंटरअमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ डेव्हेलोपमेंट येथे शिकवतात.

बातमीच्या शीर्षकामध्येच म्हटले आहे की, फोटोत दिसणारे बाळ त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचे आहे. 

मूळ लेख – El Comercia | अर्काइव्ह

या प्राध्यापकाने सीएनएन स्पॅनिषला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ते आंतरराष्ट्रीय कायदा हा विषय शिकवतात. त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने वर्गात तिचे बाळ आणले होते. ते शिकवत असताना बाळ रडत होते. त्यामुळे या प्राध्यापकांनी ते बाळ स्वतःकडे घेतले जेणेकरून ती विद्यार्थिनी व्यवस्थितपणे नोट्स लिहू शकेल. 

विशेष म्हणजे Moisés Reyes Sandoval यांनी स्वतः फेसबुकवर 6 जुलै 2016 रोजी हा फोटो शेअर केला होता. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “एका बाळाची जबाबदारी असूनही माझ्या विद्यार्थिनीने शिक्षण चालू ठेवले ही खूप अभिमानास्पद बाब आहे. मी केवळ तिला छोटीशी मदत केली.” 

मूळ पोस्ट – फेसबुक

Moisés यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांची पत्नी व मुलाचे अनेक फोटो उपलब्ध आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल फोटोविषयी केला जाणारा दावा चुकीचा आहे. फोटोतील लहान मुलगा या प्राध्यापकाचा नाही. त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचे तो मुलगा होता. तसेच या प्राध्यापकांच्या पत्नीचे निधनही झालेली नाही.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !]

Avatar

Title:पत्नीच्या मृत्यूनंतर हे प्राध्यापक आपल्या बाळाला सांभाळत शिकवतात का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False