
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी कचऱ्यामध्ये मुलगी सापडली असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना कचऱ्यामध्ये मुलगी सापडली असा दावा केला आहे. या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्ती आणि त्यांच्या सोबत एका मुलीचा फोटो देण्यात आला असून, फोटोविषयी कचरे मे मिली थी मिथून को बेटी – बदल दी किस्मत असे लिहिले आहे.
या पोस्टबद्दल सत्यता जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही गुगलवर मिथून चक्रवर्ती यांच्या मुलीबद्दल शोध घेतला. त्याचप्रमाणे एमएसएन या वेबसाईटवर देखील यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झालेली आहे.
एमएसएन या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या एका मुलाचे नाव मिमोह हे आहे, तर मुलीचे नाव दिशानी असे आहे. यापैकी दिशानी ही मुलगी मिथून चक्रवर्ती यांनी दत्तक घेतली आहे.
दिशानी हिच्याविषयी सांगायचे झाले तर, पश्चिम बंगालमध्ये कचऱ्याच्या एका ढिगाऱ्याजवळ एक मुलगी तिथल्या स्थानिक लोकांना आढळली. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्या मुलीला पश्चिम बंगालमधील एक एनजीओकडे सुपूर्त केले. त्यानंतर त्या मुलीला उपचारासाठी पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयात एनजीओने दाखल केले. परंतू मुलीची तब्येत नाजूक अवस्थेत आहे याविषयीच्या बातम्या तत्कालिन पश्चिम बंगालमधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी तत्कालिन पश्चिम बंगालमधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी वाचून, या मुलीला कायदेशीररित्या दत्तक घेण्यासाठी प्रक्रिया केली.
अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी एका मुलीला दत्तक घेतल्याच्या बातमी YOURSTORY या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि त्यांची बायको योगिता बाली यांनी दोघांनीही एनजीओद्वारा रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या मुलीला दत्तक घेतले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील घडामोडींवर आधारित मसाला या वेबपोर्टलवर मिथून चक्रवर्ती आणि दत्तक मुलगी दिशानी यांच्याविषयी बातमी प्रसिद्ध झालेली आहे.
अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्या मुलीला दत्तक घेण्याच्या संदर्भातील व्हिडिओ बॉलिवूड आजकल या युट्युब चॅनलवर 26 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर व्हिडिओ पाहू शकता.
निष्कर्ष : संपुर्ण संशोधनानंतर असे आढळून आले की, पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला मिथून चक्रवर्ती यांना कचऱ्यामध्ये सापडली मुलगी हा दावा असत्य असून, प्रत्यक्षात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सापडलेल्या मुलीला जेव्हा एनजीओकडून रुग्णालयात उपचार सुरु असतानाची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये मिथून यांना कळल्यानंतर त्यांनी कायदेशीररित्या त्या मुलीला दत्तक घेतले. त्यामुळे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला दावा असत्य आहे.

Title:अभिनेता मिथून चक्रवर्तींना कचऱ्यामध्ये त्यांची मुलगी सापडली होती का?
Fact Check By: Amruta KaleResult: False
