Fact Check : राहुल गांधी यांचे राहुल गांधी हे नाव खोटे आहे का?

Mixture राजकीय | Political

(फोटो सौजन्य : बिझनेस टूडे)

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे खरे नाव “राउल विन्सी” आहे. राहुल गांधी हे फेक नाव आहे, असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Dhamankar Naka Mitra Mandal ने ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांच्या नावाबाबत काही आक्षेप आहेत का? त्यांचे खरे नाव काय आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही राहुल विन्सी असे टाकल्यावर खालील परिणाम समोर आले.

या परिणामांमध्ये महाराष्ट्र टुडेचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि नावाबद्दल भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आरोप केले होते.

महाराष्ट्र टुडे / Archive

त्यानंतर राहुल गांधी यांच्या नावाबद्दल एका अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्याचे रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीने दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले.

हा आक्षेप निवडणूक आयोगाने नंतर फेटाळून लावत राहुल गांधी यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत 22 एप्रिल 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकमतनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकमत / Archive  

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो की राहुल गांधी यांनी राहुल विन्सी हे नाव कधी वापरले होते का? हे नाव वापरल्यास ते का वापरले असावे? यावर बीबीसीने दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते शिकत असलेल्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथील रॉलिंस कॉलेजमध्ये राहुल गांधी यांचे नाव बदलण्यात आले होते, असे म्हटले आहे.

बीबीसीचे सविस्तर वृत्त / Archive

ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक अर्नब गोस्वामी यांनी राहुल गांधी यांच्या घेतलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांनी आपल्याकडे असलेल्या पदव्या या आपल्याच असल्याचे प्रतिज्ञापत्र लोकसभेत दिले असल्याचे सांगितले आहे. इंडिया टूडेने दिलेल्या एका वृत्तात असे म्हटले आहे.

इंडिया टूडेचे सविस्तर वृत्त / Archive

राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले नाव राहुल गांधी असल्याचे आणि ते राजीव गांधी यांचे पुत्र असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि नागरित्वाच्या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्याचे वृत्त दैनिक देशदूतने 9 मे 2019 रोजी प्रकाशित केले आहे.

देशदूत / Archive  

निष्कर्ष

राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रात त्यांचे नाव राऊल अथवा राहुल विन्सी असण्याची शक्यता आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी ते नाव धारण केले होते, असे सांगण्यात येते. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले नाव राहूल गांधी असेच नमूद केलेले दिसून येते. त्यांनी आपल्या पदव्यांबद्दलही आपण लोकसभेत प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत त्यांचे नाव राहूल गांधी नसल्याची बाब असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : राहुल गांधी यांचे राहुल गांधी हे नाव खोटे आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture