Fact Check : हा व्हिडिओ पोलिसांमध्ये वाहतुक दंडाच्या पैशावरुन झालेल्या वादाचा आहे का?

False सामाजिक

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिसांनी दंडाच्या घेतलेल्या पैशाच्या वादाचा म्हणून एक व्हिडिओ Bharatsatya News या फेसबुक वापरकर्त्यांने पोस्ट केला आहे. चालान के पैसे का बँटवाड़ा के लिए जब पुलिस आपस में ही लड़ मरी, असे या व्हिडिओ खाली म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी

वाहतूकीच्या दंडाची रक्कम वाटून घेण्याबाबत पोलिसांमध्ये काय वाद झाला का हे जाणून घेण्यापुर्वी Bharatsatya News हे काय हे शोधण्याचा प्रयत्न केला. या ट्विटर खात्यावरुन मराठीत वेगवेगळी माहिती आणि वृत्त देण्यात येत असल्याचे आम्हाला दिसून आले. युटयूबवरही हे चॅनल असल्याचे आम्हाला दिसून आले. यावर विविध स्थानिक बातम्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही या पोस्टमधील व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने 26 जून 2016 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, दुकानदारांकडून लाच घेतल्यानंतर पैशाच्या वाटपावरुन दोन पोलिसांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

IndiatvnewsPost | ArchivedLink 

इंडिया टीव्हीने या घटनेच्या दिलेल्या वृत्ताचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. लोकलप्रेस

लोकलप्रेस डॉट इन

या स्थानिक संकेतस्थळानेही या घटनेचे वृत्त दिले आहे. या वृत्ता म्हटले आहे की, एक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यात लाचेची रक्कम वाटून घेण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अन्य पोलिसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली.

LocalpressPost | ArchivedLink 

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत केलेले ट्विट आपण खाली पाहू शकता.

यातून ही बाब स्पष्ट होत आहे की, हा वाद वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडवसुली केल्यानंतर रक्कम वाटून घेण्यातून झालेला नाही. हा वाद दुकानदारांकडून लाच घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यात झालेला आहे. ही घटना देखील 2016 मधील म्हणजेच जुनी आहे. त्यामुळे विद्यमान स्थितीत ती चुकीच्या पध्दतीने पसरविण्यात येत आहे. 

निष्कर्ष 

हा वाद वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडवसुली केल्यानंतर रक्कम वाटून घेण्यातून झालेला नाही. हा वाद दुकानदारांकडून लाच घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यात झालेल्या 2016 मधील वादाचा आहे. त्यामुळे या पोस्टमधील दावा असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : हा व्हिडिओ पोलिसांमध्ये वाहतुक दंडाच्या पैशावरुन झालेल्या वादाचा आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False