जेएनयूतील विद्यार्थ्यांचे फी वाढीविरोधातील आंदोलन हाताळताना पोलीस बळाचा वापर करत असल्याचे सांगत रक्तबंबाळ अवस्थेतील एका विद्यार्थ्यांचा एक फोटो सध्या समाजमाध्यमात जेएनयूचा विद्यार्थी म्हणून पसरत आहे.

धर्माच्या नावाने करोडो रुपयांची उधळण करणारे सरकार शिक्षणाचा खर्च कमी करावा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर काठ्या फोडत आहे. हाच का न्यु इंडिया. #JNUProtest अशी माहिती देत संदीप खंडागळे सॅन्डी यांनी असाच एक फोटो पोस्ट केला आहे. 

Sandip Khamdagale-Sandy.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

छायाचित्रात दिसणारा विद्यार्थी जेएनयूचा विद्यार्थी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम रिव्हर्स सर्च केले. यावेळी मिळालेल्या परिणामात आम्हाला मीडिया व्हीजिल या संकेतस्थळावरील 14 नोव्हेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात काशी हिंदू विद्यापीठातील लालबहाद्दूर शास्त्री आणि बिर्ला वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारामारी झाल्याचे म्हटले आहे. यावेळी विटांचा देखील वापर करण्यात आला. त्यामुळे लालबहाद्दूर शास्त्री वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वसतीगृह रिक्त करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हे विद्यार्थी धरणे देत होते. पोलिसांनी यावेळी केलेल्या लाठीहल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला. एका विद्यार्थ्याचे डोके फुटले, असे म्हटले आहे.

screenshot-www.mediavigil.com-2019.11.21-18_45_55.png

मीडिया व्हीजिलचे सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर जनचौक या संकेतस्थळावरही या विद्यार्थ्याच्या छायाचित्रासह एक वृत्त दिसून आले. या वृत्तातही बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे म्हटले आहे. 

screenshot-janchowk.com-2019.11.21-19_17_21.png

जनचौक संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली आणि या विद्यार्थ्याचा जेएनयूशी काय संबंध आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही वाराणसीतील लंका पोलीस ठाण्याचे अधिकारी भारतभुषण तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या परिसरात ही घटना घडल्याचे स्पष्ट केले. या विद्यार्थ्याचा जेएनयूशी कोणताही संबंध असल्याचेही त्यांनी नाकारले. हा विद्यार्थी पोलीसांच्या लाठीमारात नव्हे तर पळताना फरशीवर प़डल्याने जखमी झाल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या ठीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निष्कर्ष

बनारस हिंदू विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या परिसरात वसतीगृहातून काढल्याने हा विद्यार्थी आंदोलन करत होता. ते आंदोलन फी वाढीविरोधात नव्हते. या विद्यार्थ्याचा जेएनयूशी कोणता संबंध असल्याचेही आढळून येत नाही. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये तो पोलीसांच्या लाठीमारात जखमी झाला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी तो फरशीवर पडल्याने जखमी झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे समाजमाध्यमात हा जेएनयूचा विद्यार्थी असल्याची पसरत असलेली माहिती असत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळले आहे.

Avatar

Title:Fact : बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे छायाचित्र जेएनयूचा विद्यार्थी म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False