सध्या इस्रायल-हमास संघर्ष विकोपाला गेला असून इस्रायलने 14 ऑक्टोबर रोजी गाझामधील  नागरिकांना उत्तरेकडील प्रदेश रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम महिला भारताचा झेंडा घेऊन जात आहेत.

दावा केला जात आहे की, इस्रायली सैनिकांनी आपल्यावर हल्ला करु नये म्हणून पॅलेस्टाईनमधील मुस्लिम महिलांनी गाजापट्टिमधून पलायन करताना सोबत भारताचा झेंडे घेऊन जात आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गाझाचा नाही.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “गाजापट्टिमध्ये तिरंगा घेऊन पलायन करताना पॅलेस्टाईनमधील मुस्लिम महिला कारण तिरंगा सोबत घेतला तर इस्त्राईल हमला करणार नाही, याची त्यांना खात्री वाटते.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एका युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ आढळला. इस्रायल-हमास संघर्षाच्या एक महिना आधी सप्टेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “करबलामध्ये अरबेनदरम्यान भारतीय ध्वजासह.”

https://youtube.com/shorts/mx3SQBFe9Ig?si=WlM3pzmX5g6dfm7x

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ इराकमधील करबला शहरातील अरबेन यात्रेचा आहे.

अरबेन यात्रा

पैगंबर मुहम्मद यांचे नातू आणि तिसरे शिया मुस्लिम इमाम हुसैन इब्न अली यांच्या हौतात्म्याची आठवण म्हणून अरबेन यात्रा काढली जाते.

दरवर्षी इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यातील मोहरमच्या दहाव्या दिवशी येणारा दिवस आशुरा स्मरणाच्या 40 दिवसानंतर शोक कालावधीच्या शेवटी इराकमधील करबला या शहरात ही यात्रा आयोजित केली जाते.

जगभरातील मुस्लिमांमध्ये अरबेन यात्रेमध्ये हसभागी होण्यासाठी येतात. या वर्षीदेखील यात्रेत जगभरातून 25 दशलक्ष सहभागींना आकर्षित केले अंदाज आहे. अधिक महिती आपण येथे पाहू शकतात.

एनडीटीव्हीने 6 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये अरबेन यात्रेनिमित्त इराकमधील नजफ शहरा कडून करबलाकडे जाणारे भारतीय मुस्लिमांशी संवाद साधला होता. या ठिकाणी काही भारतीय मुस्लिम यात्री त्यांच्यासोबत तिरंगा घेऊन जाताना दिसतात.

https://youtu.be/8mLnj6ViWdE?si=EXzfC6oSVtHQUwoS

गाझामध्ये सध्याची परिस्थिती

इस्रायली लष्कराने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, गाझाच्या उत्तर भागात हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांना तेथून हलवण्याचा आपण प्रयत्न करत आहेत. याउलट, हमासने लोकांना त्यांच्या घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

https://youtu.be/E9JSHYllzpQ?si=bpIDY69WK7oLOnfq

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गाजापट्टीचा नाही. भारतीय झेंडा घेऊन जाणाऱ्या पॅलेस्टाईनमधील मुस्लिम महिला नाहीत. हा इराकमधील अरबेन यात्राचा व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पॅलेस्टिनने भारतीय झेंड्याचा वापर केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False