‘त्या’ व्हायरल फोटोतील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अभाविप कार्यकर्ता नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political सामाजिक

देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीतही जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यावर त्याविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पोलिसांचे जॅकेट घातलेल्या साध्या वेशातील एका तरुणाचे छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. ही व्यक्ती भरत शर्मा असून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. साध्या वेशातील लोक विद्यार्थ्यांना कशी काय मारहाण करू शकतात, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

Chhaya Thorat FB Post.png

फेसबुकवरील मूळ पोस्ट 

तथ्य पडताळणी

सदरील फोटो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याबाबत खुलासा केला. हे दोन्ही फोटो वेगवेगळ्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले. साध्या वेशातील तरुण दिल्ली पोलिसांचा कर्मचारी असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी समाजमाध्यमातील भरत शर्मा या प्रोफाईलचा या कॉन्स्टेबलशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. साध्या वेशातील ही व्यक्ती पोलीस कॉन्स्टेबलच असून ती पोलीस दलात कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.

Archive

चिन्मय बिस्वाल यांनी याबाबत दिलेला खुलासाही आपण खाली पाहू शकता.

Archive

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतानाही त्यांनी समाजमाध्यमात हा पोलीस कर्मचारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असल्याचा करण्यात येत असलेला दावा खोडून काढला. साध्या वेशातील काही पोलीस कर्मचारीही तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. 

screenshot-www.aninews.in-2019.12.18-14_54_33.png

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ज्या पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र समाजमाध्यमात फिरत आहे. त्या अरविंद कुमार यांच्याशीही एएनआयने बातचीत केली. त्याचा अनुवाद खाली देत आहोत. ‘’त्या घटनेच्या वेळी मी साध्या वेशात होतो. मला माझ्याबद्दल समाजमाध्यमात चुकीची माहिती पसरत असल्याचे आज सकाळी समजले. मी सुर्या हॉटेलजवळ थांबलेलो असताना काही जणांनी माझे छायाचित्र घेतले होते.’’

screenshot-www.aninews.in-2019.12.18-15_11_15.png

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

निष्कर्ष

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून समाजमाध्यमात प्रोफाईल असणारी भरत शर्मा ही व्यक्ती आणि दिल्ली पोलीस दलातील कर्मचारी अरविंद कुमार या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:‘त्या’ व्हायरल फोटोतील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अभाविप कार्यकर्ता नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False