इम्रान खान यांची मिमिक्री करणारा हा कलाकार पाकिस्तानी नाही. तो भारतीय आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाच्या मजेशीर मिमिक्रीचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. भारतातील कॉमेडियन जसे भारतीय नेत्यांची मिमिक्री करून व्यंग करतात, तसे आता पाकिस्तानातही होऊ लागले असा दावा करीत म्हटले की, व्हिडियोत दिसणारा कलाकार पाकिस्तानातील असून, इम्रान खान यांची कशी बेईज्जती केली ते पाहा. 

महेश व्हावळ, हेमंत पांचपोर, माधव भिडे, सुधीर मोघे यासह विविध युजर्सने हा व्हिडियो शेयर करून दावा केला की, सदरील व्हिडियोमधील कलाकार पाकिस्तानी आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

गुगलवर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची मिमिक्री करणाऱ्या व्हिडियोबाबात शोधले असता आढळले की, ओपिनियन पोस्ट नामक एक हिंदी युट्यूब चॅनलवर इम्रान खान यांची नक्कल करणारे अनेक व्हिडियो आहेत. ओपिनियन पोस्ट ही दिल्ली येथील एक मॅगझीन आहे. 

इम्रान खान यांची नक्कल करणारा या कलाकाराचे नाव सौरभ सिंघल आहे. ते दिल्ली येथील व्हॉईस आर्टिस्ट आणि कॉमेडियन आहेत. गुगलवर त्यांच्या शोध घेतला असता त्यांची वेबसाईट आढळली. त्यानुसार, त्यांनी विविध ब्रँड्स आणि न्यूज चॅनेलसोबत काम केल्याचे कळते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हायरल व्हिडियो मूळात त्यांनी ओपिनियन पोस्टसाठी 9 ऑक्टोबर रोजी केला होता. तो ओरिजनल व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीने सौरभ सिंघला यांच्याशी आधी ईमेल आणि नंतर फोनवर संपर्क केला. ईमेलमध्ये त्यांनी म्हटले की, मी दिल्लीतील कलाकार आहे. अनेक न्यूज चॅनल्स, रेडिओ स्टेशन्स सोबत मी काम केलेले आहे. ओपिनियन पोस्ट आणि राग दरबारी या दोन वेब पोर्टल्सवर मी इम्रान खान यांची अनेक वेळा मिमिक्री केलेली आहे. 

एवढेच नाही. त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला स्पष्टीकरण देणारा एक व्हिडियोदेखील पाठवला. यामध्ये त्यांनी ते पाकिस्तानी नसल्याचे सांगितले. ते म्हणतात की, “मी इम्रान खान यांची मिमिक्री करीत असतो. म्हणून मी पाकिस्तानी होत नाही. उद्या जर मी डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल केली तर मी अमेरिकन थोडीच होणार आहे! तर आपल्या सर्वांना विनंती आहे की, कलाकाराला कलाकारच राहू द्या आणि मला भारतीयच राहू द्या.” त्यांचा मूळ व्हिडियो खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, इम्रान खान यांची मिमिक्री करणारा कलाकार पाकिस्तानी नाही. त्याचे नाव सौरभ सिंघल असून, ते भारतीय आहेत. त्यामुळे सदरील व्हिडियोसोबतचा दावा चुकीचा ठरतो.

Avatar

Title:इम्रान खान यांची मिमिक्री करणारा हा कलाकार पाकिस्तानी नाही. तो भारतीय आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


1 thought on “इम्रान खान यांची मिमिक्री करणारा हा कलाकार पाकिस्तानी नाही. तो भारतीय आहे. वाचा सत्य

Comments are closed.