Fact Check : चीन आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या 880 किमीच्या महामार्गाचे सत्य काय?

False आंतरराष्ट्रीय | International सामाजिक

चीन आणि पाकिस्तानला जोडणारा हा महामार्ग विक्रमी 36 महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. आता हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. आपण हा महामार्ग कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकता, अशी माहिती Maharudra Tikunde यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

हा महामार्ग नक्की चीन आणि पाकिस्तानला जोडणारा आहे का? याचे सत्य शोधण्यासाठी आम्ही इनव्हिडद्वारे व्हिडिओतील काही प्रतिमा घेतल्या. त्यानंतर रिव्हर्स इमेज सर्चद्वारे याचा शोध घेतला. त्यावेळी 2 जानेवारी 2019 रोजी हा व्हिडिओ न्यू चायना टीव्हीने प्रसारित केल्याचे दिसून आले. याच्या शीर्षकात ‘ Yaxi road,Yaxi Highway’  असे लिहिले होते.

https://www.facebook.com/wildz0ne/videos/2098631646864970/

ARCHIVE

China Xinhua News ने 9 जानेवारी 2019 रोजी आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

https://www.facebook.com/XinhuaNewsAgency/videos/282254732349307/

ARCHIVE

त्यानंतर आम्ही या महामार्गाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा Yaxi द्रुतगती महामार्ग असून 240 किलोमीटर असल्याचे आढळून आले. तो बीजिंग ते कुनमिंग दरम्यान बांधण्यात आला आहे. यात 25 बोगदे आणि 270 वायडक्ट्स आहेत. या महामार्गाच्या उभारणीस 2007 मध्ये सुरुवात करण्यात आली आणि तो 2012 मध्ये बांधून पुर्ण झाला. तो बांधण्यासाठी अंदाजे 3.3 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला.

ARCHIVE

मग प्रश्न उद्भवला की चीन आणि पाकिस्तानदरम्यान महामार्ग आहे का? असल्यास तो किती किलोमीटरचा आहे. त्यावेळी आम्हाला आढळले की चीन आणि पाकिस्तान दरम्यान 1300 किलोमीटरचा काराकोराम महामार्ग आहे. तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून हसन अब्दाल ते काश्मीर पर्यंत जातो आणि चीनच्या राष्ट्रीय महामार्ग 314 ला ओलांडतो. याबाबत आम्हाला बीबीसीचा माहितीपट दिसून आला. हा माहितीपट आपण खाली पाहू शकतो.

ARCHIVE

वरील माहितीवरुन हे स्पष्ट झाले की, हा चीन आणि पाकिस्तानदरम्यानचा महामार्ग नाही. हा Yaxi द्रुतगती महामार्ग आहे. चीनमध्येच हा महामार्ग असून 240 किलोमीटरचा आहे.

निष्कर्ष 

हा चीन आणि पाकिस्तानदरम्यानचा महामार्ग नाही. हा Yaxi द्रुतगती महामार्ग आहे. चीनमध्येच हा महामार्ग असून 240 किलोमीटरचा आहे. 

Avatar

Title:Fact Check : चीन आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या 880 किमीच्या महामार्गाचे सत्य काय?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False