
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये लघवीच्या रंगावरुन आरोग्याची कल्पना येवू शकते, असे म्हटले आहे. लोकमतने फेसबुकवर पेजवर ही पोस्ट टाकली असून, ह्या पोस्टला आमच्या टीमकडून पडताळणी होईपर्यँत 747 लाईक, 70 शेअर आणि 1 कमेंट मिळाले आहे.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट वेगवेगळ्या फेसबुक पेजवर आढळली. यामध्ये लेस्टली मराठी वेब पोर्टलवर आणि डेलीहंट या वेब पोर्टलवर या संदर्भातील पोस्ट व्हायरल झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.
सौजन्य – लेस्टली
सौजन्य – डेलीहंट
या पोस्टमध्ये लोकमत सोशल मीडिया पेजवर लघवीच्या रंगात फरक आल्यास, व्यक्तिला कोणकोणत्या आरोग्य विषयक त्रासांची, रोगांच्या लक्षणांची माहिती सांगितली आहे.
सौजन्य – लोकमत
तसेच डेलीहंटमध्येही लघवीच्या रंगातील फरकानुसार आरोग्यावर होणारे परिणाम सांगण्यात आले आहे.
सौजन्य – डेलीहंट
त्याचप्रमाणे डेलीहंट आणि लेस्टली या दोन्हीही वेब पेजवर लघवीचा रंग आणि आरोग्य या विषयावर माहिती देतांना ब्रिटनच्या विंडसर युरोलॉजीचे युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो यांनी सांगितले आहे असे म्हटले आहे.
यासंदर्भात अधिक सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो हे टाकल्यावर खालील रिझल्ट समोर आले.
त्यानंतर Mr. Mark Laniado MBBS यावर क्लिक केल्यानंतर केवळ मुत्रविकार तज्ञ आणि विविध मुत्ररोगाशी निगडीत विविध उपचार पद्धती याबद्दल माहिती समोर आली.
लघवीचा रंग आणि आरोग्य या विषयावर संपुर्ण संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो यांचा लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचे आरोग्य अशा आशयाचा कोणताही संशोधनपर रिसर्च पेपर किंवा आर्टिकल त्या वेबसाईटवर आढळले नाही. परंतु डॉ. मार्क लैनियाडो हे ब्रिटनमधील मुत्रविकारतज्ञ आहेत हे स्पष्ट झाले आहे.
लोकमत पेजवरील बातमीमध्ये मात्र कोणत्याही मुत्रविकार तज्ञाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये.
सौजन्य – लोकमत
याच विषयावर आम्ही एका मुत्रविकार तज्ञ डॉ. अतुल सोनी यांच्याशी बातचीत केली. या संदर्भात ते असे म्हणाले की, फार थोड्या म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या आजारांची लक्षणे लघवीच्या रंगावरुन ओळखता येतात. परंतू योग्य निदान होण्यासाठी मात्र पॅथॉलॉजी लॅब मधून मुत्र तपासणी केल्यानंतरच आजार, लक्षणे आणि आरोग्य याबद्दल एक डॉक्टर म्हणून उपचार करता येतात. त्यामुळे वरकरणी लघवीच्या रंगावरुन केवळ रोगांच्या लक्षणांचा अंदाज बांधता येतो, पण योग्य निदान हे लॅब तपासणीनंतरच करता येते.
डॉ. अतुल सोनी
(मुत्रविकार तज्ञ), औरंगाबाद.
निष्कर्ष : संपुर्ण तपास आणि संशोधना नंतर लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचे आरोग्य या संदर्भातील पोस्ट ही अर्धसत्य आहे.
