श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र बनावट; वाचा सत्य

False सामाजिक

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.08.15-16_07_28.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी पत्रकार मुबाशीर मुश्ताक यांच्या ब्ल़ॉगवर त्याचा 11 जुलै 2010 रोजी प्रसिध्द झालेला एक लेख दिसून दिला. लाल चौकाचे हेच छायाचित्र या लेखात दिसत असून या छायाचित्रात तिरंगा फडकत असल्याचे मात्र दिसून येत नाही. हे छायाचित्र आपण खाली पाहू शकता. हे छायाचित्र 22 जून 2010 रोजीचे असल्याचे या खाली नमूद करण्यात आलेले आहे.

screenshot-mubasshir.blogspot.com-2020.08.15-16_40_13.png

मुबाशीर मुश्ताक यांचा ब्लॉग / संग्रहित

मुबाशीर मुश्ताक यांनी आपल्या ट्विटर खात्यावरूनही हे छायाचित्र जुने म्हणजेच 22 जून 2010 रोजीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

संग्रहित

सध्या व्हायरल होत असलेले बनावट छायाचित्र आणि मुबाशीर मुश्ताक यांनी 2010 मध्ये टिपलेले छायाचित्र याची तुलना खाली करण्यात आली आहे.

Factcrescendo.com.png

निष्कर्ष

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र बनावट आहे. पत्रकार मुबाशीर मुश्ताक यांनी स्वत: याबाबत ट्विट केले आहे.

Avatar

Title:श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र बनावट; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False