अमेरिकेतील रूग्णालयाचे छायाचित्र अयोध्येतील नियोजित बाबरी रूग्णालयाचा वास्तूकला आराखडा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी 5 एकर जमीन दिली आहे. या जागेवर केवळ मशीद बांधली जाणार नसून रुग्णालयही उभारण्यात येणार, असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. या नियोजित रूग्णालयाचा वास्तूकला आराखडा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र या नियोजित रूग्णालयाचे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

screenshot-www.facebook.com-2020.08.08-18_09_10.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डातर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित रूग्णालयाचा हा वास्तूकला आराखडा आहे का, हे जाणून घेण्यासाठी रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतला. त्यावेळी हे व्हर्जिनिया विद्यापीठाच्या आरोग्य प्रणालीचे संकेतस्थळ दिसून आले. या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे छायाचित्र (संग्रहित) दिसून आले. या आरोग्य प्रणालीच्या लिंक्डइन (संग्रहण) खात्यावर देखील हे छायाचित्र दिसून आले.  अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये असलेल्या ‘यूव्हीए हेल्थ सिस्टम’ नावाच्या रुग्णालयाचे हे छायाचित्र असल्याचे यातून स्पष्ट झाले.

screenshot-bangla.factcrescendo.com-2020.08.08-18_49_21.png

युव्हीए हेल्थ सिस्टमच्या फेसबुक पेजवरही हे छायाचित्र दिसून आले. खाली या रुग्णालयाच्या मुळ छायाचित्रात आणि व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात करण्यात आलेले बदल तुलनात्मकरित्या दाखवले आहेत. आपण ते पाहू शकता.

screenshot-bangla.factcrescendo.com-2020.08.08-18_45_47.png

उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने याबाबत स्पष्टीकरण देताना, अयोध्येजवळ धन्नीपूर गावात ट्रस्टला दिलेल्या पाच एकर जागेवर रूग्णालयासह विविध सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. याठिकाणी बाबरी रुग्णालय उभारणार असल्याचा आणि कफील खान यांना रूग्णालयाचे संचालक म्हणून निवडण्यात आल्याचा मात्र इन्कार केला आहे. एबीपी गंगा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

screenshot-archive.is-2020.08.10-15_25_01.png

एबीपी गंगा / संग्रहित 

त्यानंतर द टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर 8 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार सुन्नी वक्फ बोर्डाने बाबरच्या नावाने रूग्णालय उभारणार येणार असल्याची आणि कफील खान यांना रूग्णालयाचे संचालक म्हणून निवडण्यात आल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी लखनौ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

Times.png

द टाईम्स ऑफ इंडिया / संग्रहित

याव्यतिरिक्त हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुन्नी वक्फ बोर्डाने  बनविलेल्या ट्रस्टचे अध्यक्ष अथर हुसेन यांनी सांगितले की, तेथे मशिदीबरोबरच रूग्णालय आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे म्हटले असल्याचे दिसून आले. परंतू त्यांनी कुठेही बाबरी हॉस्पीटल उभारणार असल्याचे म्हटलेले दिसत नाही. 

संग्रहित

फॅक्ट क्रेसेंडोने सुन्नी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोएब मोहम्मद सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ही पोस्ट बनावट आहे. याबाबत लखनौ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

निष्कर्ष

अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डातर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित रूग्णालयाच्या  वास्तूकला आराखड्याचे हे छायाचित्र असल्याचे असत्य आहे. हे अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील युव्हीए हेल्थ सिस्टमच्या रुग्णालयाचे छायाचित्र आहे. 

Avatar

Title:अमेरिकेतील रूग्णालयाचे छायाचित्र अयोध्येतील नियोजित बाबरी रूग्णालयाचा वास्तूकला आराखडा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False