विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

सोशल मीडियावर सध्या एका जिगरबाज लाईनमनचा व्हिडियो व्हायरल होत आहे. विद्युत तारांमध्ये अकडकलेल्या झाडाची फांदी काढण्यासाठी हा लाईनमन तारांवर चालत गेला. हा व्हिडियो कोकणातील देवगड शिरगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो तेलंगणा येथील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती […]

Continue Reading

व्हाईट व्हाऊसमध्ये आंदोलक घुसल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा या व्हिडियोमागचे सत्य

पोलिसांच्या हातून एका कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, सुरक्षाकवच भेदून आक्रमक आंदोलक व्हाईट हाऊसमध्ये घुसले. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता, हा व्हिडियो व्हाईट व्हाऊसचा नसल्याचे समोर आले. काय आहे […]

Continue Reading

कोंबड्यामध्ये ॲपोकॅलिप्टीक नावाचा विषाणू अस्तित्वात नाही; वाचा सत्य

सध्या कोंबड्यांमध्ये असणारा ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू कोरोनापेक्षा भयंकर असून जर तो माणसांमध्ये पसरला तर जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या संपेल असा दावा सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. डॉ. मायकल ग्रेगरी यांच्या पुस्तकाचा दाखला देत काही जण हा दावा करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने कोंबड्यांमध्ये ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू अस्तिवात आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

लाटा उसळण्याचा हा व्हिडियो वरळी सी-लिंक पुलावरील नाही. तो 3 वर्षे जूना आहे.

निसर्ग वादळाने मुंबईला हुलकावणी जरी दिली असली तरी सोशल मीडियावर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. खवळलेल्या समुद्राच्या उंच लाटा एका पुलाला गिळंकृत करतानाचा व्हिडियो सध्या फिरत आहे. हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यान मुंबईतील वरळी सी-लिंक पुलाचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता हा व्हिडियो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे समोर आले. […]

Continue Reading

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर लैंगिक आरोप झाले आहेत; नवाजुद्दीनवर नाही. वाचा सत्य

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव सध्या वादात सापडले आहे. नुकतेच त्याच्या 21 वर्षीय पुतणीने नवाजुद्दीनच्या भावावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ही बातमी देताना मीडियातील काही वेबसाईट्सकडून एक चूक झाली. ती चूक म्हणजे, माध्यमांनी नवाजुद्दीनवरच पुतणीने आरोप केल्याचे म्हटले. न्यूज-18 लोकमत वृत्तस्थळानेही अशीच बातमी दिली. ‘पुतणीने नवाजुद्दीनवर लावले गंभीर आरोप’, असे न्युज-18 लोकमतच्या 3 जून […]

Continue Reading