गुजरातच्या 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी : सत्य पडताळणी

False

सोशल मीडियावर सध्या लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गुजरातमध्ये 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी असा आशय असलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या वर भक्तांना बरनॉल आणून द्या कोणीतरी असे लिहिले आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोची फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकच्या संतोष शिंदे या अकाउंटवरुन 190 शेअर, 160 लाईक्स आणि 7 कमेंटस् मिळाले आहेत.  

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये केवळ गुजरातच्या 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी एवढेच शब्द स्पष्टपणे दिसत आहेत. यापैकी गुजरातच्या 4 हजार गावांत हे शब्द गुगलवर सर्च करताना टाईप केले. त्यानंतर खालील रिझल्ट समोर आले.

व्हायरल होणारी पोस्ट ही डिसेंबर 2017 मधील आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर ती न्युज शोधण्याचा प्रयत्न केला. विविध वृत्तपत्रांमध्ये, वेब पोर्टलवर या विषयावर बातमी प्रसिद्ध झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण यासंदर्भातील सविस्तर बातमी वाचू शकता.

दैनिक लोकमतअर्काईव्ह

मराठी दुनियादारीअर्काईव्ह

वेब दुनियाअर्काईव्ह

काय आहे नेमके हे प्रकरण ?

हे प्रकरण आहे गुजरातमधील आदिवासी पट्ट्यातील चाकमांडला या दुर्गम भागातील धरमपुर विधानसभा मतदारसंघातील. डिसेंबर 2017 मध्ये गुजरातमध्ये आदिवासीबहुल मतदारसंघात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी आदिवासीबहुल मतदारसंघात अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचे वर्चस्व होते. या परिस्थितीत उंबरगाव येथून भाजपचे रमण पाटकर तब्बल ननवी निवडणूक लढवत होते. याआधी रमण पाटकर यांनी याच प्रदेशातून आठ निवडणूक लढविली आहे. ही त्यांची नववी निवडणूक होती. त्यापैकी पाटकर हे चार वेळा विजयी झाले आहेत.

उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर प्रकल्पाला तेथील मच्छीमारांचा विरोध आहे. या सर्व गावामध्ये हार्दिक पटेल यांच्या पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे येथे निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवारांना त्यावेळी अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. सूरत, नवसारी, मेहसाणा, राजकोट या जिल्ह्यात तर भाजपसाठी संचारबंदी असल्याचे फलकच त्यावेळी झळकले. धरणामुळे चाकमंडला मधील आदिवासी विस्थापित होणार या विचारामुळे गावातील ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत, भाजपला विरोध करण्यासाठी असे फलक त्यावेळी लावण्यात आले.

सौजन्य : लोकमतडोरवन नेटवर्क l अर्काईव्ह

ही संपुर्ण घटना डिसेंबर 2017 मधील असून, आता 2019 लोकसभा निवडणूकीच्या काळात जाणीवपुर्वक व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या 2019 मध्ये गुजरातमधील कोणत्याही 4 हजांर गावात भाजपला प्रचारबंदी करण्यात आलेली नाही. जुनी घटना जाणीवपुर्वक आत्ताच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो गुजरातमध्ये 4 हजार गावात भाजपला प्रचारबंदी ही घटना डिसेंबर 2017 मधील आहे. त्यामुळे आत्ताच्या 2019 लोकसभा निवडणूकीच्या काळात जाणीवपुर्वक अशा आशयाची पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. सध्या वर्तमान परिस्थितीत गुजरातमध्ये कुठेही भाजप प्रचारला बंदी घालण्यात आलेली नाहीये. त्यामुळे गुजरातमध्ये 4 हजार गावात भाजपला प्रचारबंदी हे तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:गुजरातच्या 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False