भारत पाकिस्तानचे पाणी बंद करणार का? : सत्य पडताळणी

Mixture/अर्धसत्य आंतरराष्ट्रीय

सध्या सोशल मिडीयावर पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. भारत – पाकिस्तानचे पाणी बंद करणार?  या विषयावर सध्या सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Facebook l अर्काइव्ह

या पोस्टला ५१९ शेअर असून, १.९ k एवढे लाईक आहेत. तसेच १०४ कमेंट्स आहेत.

सत्य पडताळणी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध कारणाने सतत पाणी प्रश्नावर वेगवेगळ्या मुद्यांवर रोज नवीन विधाने येत आहेत. यामध्ये भारत पाकिस्तानचे पाणी बंद करणार? अशा गोष्टी पुढे येत आहेत. याविषयी ट्विटरवर असणारी ही पोस्ट.

अर्काइव्ह  

वरील ट्वीटर पोस्ट मध्ये केंद्रीय नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात १.०० मिनिटावर indus city याचा संदर्भ देत, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाणी करार कोणत्या आधारावर झाला आहे याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Indus city l अर्काइव्ह

काय आहे सिंधू पाणी वाटप करार ?

१९६० साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांच्यात झालेला हा करार आज ५६ वर्षांनंतरही टिकून आहे. वर्ल्ड बँकेने हा करार घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता.

ह्या करारानुसार सिंधु नदी व तिला मिळणाऱ्या पाच नद्यांतल्या पाण्याचे वाटप ठरवण्यात आले होते. सिंधु, चिनाब व झेलम या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी, बियास व सतलज या पूर्वेकडच्या नद्यांच्या पाण्याबाबत भारताला सर्व अधिकार असतील. या जोडीला सिंधु, चिनाब, झेलम या पश्चिमेकडच्या नद्यांतूनही भारताला जम्मू-काश्मीर राज्यात १.३ दशलक्ष एकर सिंचनाची, ३.६ दशलक्ष एकर फीट पाणी साठवण्याची व पाण्याचा वीज उत्पादन करण्यासाठी उपयोग करण्याचीही मान्यता आहे. ह्या पश्चिमेकडच्या नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी २० टक्के पाणी उपलब्ध आहे. आजवर जम्मू-काश्मीरमध्ये फक्त ६.४ लाख एकर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर तेथे धरणे न बांधल्याने पाण्याची साठवण क्षमता जवळजवळ नगण्य आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे नियंत्रण जरी भारताकडे असले तरी आपल्याकडेच दोन राज्यांत कालव्याविषयी वाद असल्याने सतलजचे बरेचसे पाणी पाकिस्तानात वाहून जाते.

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

महराष्ट्र टाइम्स l अर्काइव्ह

या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

सौजन्य : बीबीसी हिंदी

याबद्दल खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

दैनिक भास्कर l अर्काइव्ह

BBC Hindi l अर्काइव्ह

दोन्ही देश मिळून सिंधू जल करारमध्ये बदल करू शकतात. अशी बातमी बीबीसी हिंदी मध्ये २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाली होती. परंतु आता पुलवामा हल्ल्यानंतर मात्र परत व्हायरल होणाऱ्या पोस्टमूळे हा मुद्दा ऐरनीवर आला आहे.

परंतु  पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून अजून पर्यंत पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबविण्याचा असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे समोर आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केवळ भारताच्या हद्दीतील तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या पाणी बाबतीतच निर्णय राबविण्यात येत आहे. त्या भारताच्या हद्दीतील तीन नद्यांवरील पाणी भारताकडेच रहावे यासाठी या नद्यांवर विविध प्रोजेक्ट करण्यात येणार आहे.

सौजन्य : BBC Hindi

तसेच पुलवामा हल्ल्यानंतर मात्र सिंधू नदी करार मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून पाकिस्तानकडे जाणारे पाणी भारताकडून रोखले जाणे यासंदर्भात नवीन काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीये.

वर दिलेली बातमी २२ फेब्रुवारी २०१९ रोजी बीबीसी हिंदीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. वरील बातमीसाठी खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर बातमी वाचा.

BBC Hindi l अर्काइव्ह

निष्कर्ष : भारताकडून पाकिस्तानकडे जाणारे सिंधू पाणी वाटप करारानुसार कोणत्याही प्रकारचे पाणी अडविण्यात येणार नाहीये. केवळ भारताच्या हद्दीत असणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर विविध प्रोजेक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये संमिश्र माहिती देण्यात आली आहे.

Avatar

Title:भारत पाकिस्तानचे पाणी बंद करणार का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture