भारतरत्न’वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी

खोटी न्यूज I Fake News राष्ट्रीय

भारतरत्न विषयावरील ओवेसींची टीका

परिचय

भारतीय राजकारणात टीकेची झोड कधी कुणावर आणि कोणत्या विषयावर होईल याबदल, कशाचीही शाश्वती देता येणार नाही. टीका करतांना राजकारणात विषयांचे बंधन कधीच राहत नाही असे दिसून आलेले आहे. सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जोरदार टीका केल्याची बातमी झळकत आहे. त्यामुळेच खासदार ओवेसी यांच्या टीकामधील तथ्य जाणून घेण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न.

कथन

भारतीय राजकारणात कोण कुणावर कोणत्या विषयावर टीका करेल काही सांगता येत नाही. एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी  यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त विधान केले आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला. तसेच इतर काही ठिकाणी भाषण देतांनाही त्यांनी भारतरत्न या विषयावर वादग्रस्त विधाने  केली आहेत.

भारतरत्न विषयावर टीका करतांना ओवेसी यांनी  किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केलं. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. 

(व्हिडीओ हिन्दुस्तान टाईम्सवरून साभार)

Times of India l Times Now l Lokmat

तथ्य पडताळणी

  • भारतरत्न पुरस्कार बद्दल माहिती

भारतरत्न हा भारतीय गणराज्याचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मुळात हा पुरस्कार हा एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेच्या आधारावर देण्यात येतो. १९५४ पासून भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला हा पुरस्कार केवळ साहित्य, कला, विज्ञान, आणि सार्वजनिक सेवांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांनाच दिला जात असे. पण २०११ पासून या नियमात बदल करून, आता हा पुरस्कार मानवी प्रयत्नांचे कोणतेही क्षेत्र यासाठी दिला जातो. विशेष म्हणजे हा पुरस्कार देताना पहिला नियम असा आहे की, या पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीची निकष हि कोणत्याही जातीभेद, वर्णभेद, आर्थिक स्थिती भेद, किंव्हा लिंगभेद यांच्या परे आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार मध्ये समाविष्ट होतो. भारतरत्न हा पुरस्कार केवळ भारतीय नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तीलाच मिळतो असे नाही तर, आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय व्यक्तींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

(व्हिडीओ लर्नसबकुछ साभार)

आता प्रश्न आहे की, खासदार ओवेसी यांनी केलेल्या टीकेनुसार काय भारतरत्न हा पुरस्कार म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असे आहे का? याचे उत्तर असे आहे की, मुळात भारतरत्न पुरस्कार हा जातीभेद आणि लिंगभेद यावर आधारित कधीच देण्यात येत नाही.

याशिवाय आत्तापर्यंत एकूण ४५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. खरेतर भारतरत्न पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीच्या जाती बद्दल उल्लेख करणेच चुकीचेच आहे. कारण हा पुरस्कारच कोणत्या विशिष्ट जाती बद्दल नाहीये. परंतु खासदार ओवेसी यांच्या टीकेचे तथ्य जाणून घेण्याच्या प्रयत्नातून समोर आलेल्या गोष्टी अशा आहेत.

आत्तापर्यंत मुस्लीम समाजातील (६) सहा जणांना पुरस्कार मिळाला आहे, तर इतर समाजातील अनेक व्यक्तींना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

(व्हिडीओ वनइंडियाहिन्दी साभार)

DaytoDayGK l Wikipedia

Bharat Ratna Award Winners

S.No.Name of the AwardeesYear
1Shri C. Rajagopalachari1954
2Dr.Sarvepalli Radhakrishnan1954
3Dr.C. V. Raman1954
4Dr.Bhagwan Das1955
5Dr.M Visvesvaraya1955
6Pt. Jawaharlal Nehru1955
7Pt. Govind Ballabh Pant1957
8Dr.Dhondo Keshav Karve1958
9Dr.Bidhan Chandra Roy1961
10Shri.Purushottam Das Tandon1961
11Dr.Rajendra Prasad1962
12Dr.Zakir Husain1962
13Dr.Pandurang Vaman Kane1963
14Shri Lal Bahadur Shastri (posthumous)1966
15Smt.Indira Gandhi1971
16Shri V. V. Giri1975
17Shri K. Kamaraj(posthumous)1976
18Mother Teresa1980
19Shri Acharya Vinoba Bhave1983
20Khan Abdul Ghaffar Khan1987
21Shri M. G. Ramachandran1988
22Dr.B. R. Ambedkar1990
23Nelson Mandela1990
24Shri.Rajiv Gandhi (posthumous)1991
25Sardar Vallabhbhai Patel (posthumous)1991
26Shri Morarji Desai1991
27Maulana Abul Kalam Azad (posthumous)1992
28Shri J. R. D. Tata1992
29Shri Satyajit Ray1992
30Shri Gulzarilal Nanda1997
31Smt.Aruna Asaf Ali(posthumous)1997
32Dr.A. P. J. Abdul Kalam1997
33Smt.M. S. Subbulakshmi1998
34Shri Chidambaram Subramaniam1998
35Loknayak Jayaprakash Narayan (posthumous)1999
36Professor Amartya Sen1999
37Lokpriya Gopinath Bordoloi (posthumous)1999
38Pandit Ravi Shankar1999
39ShushriLata Mangeshkar2001
40Ustad Bismillah Khan2001
41Pandit Bhimsen Joshi2009
42Professor C. N. R. Rao2014
43Shri Sachin Tendulkar2014
44Pandit Madan Mohan Malaviya (posthumous)2015
45Shri Atal Bihari Vajpayee2015
46Pranab Mukherjee2019
47Bhupen Hazarika2019
48Nanaji Deshmukh2019

निष्कर्ष :
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जी टीका केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, कारण भारतरत्न पुरस्कार हा कोणत्याही जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, आणि आर्थिकस्थितीभेद वर आधारित नसून, केवळ व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर आधारित आहे. आणि आत्तापर्यंत मुस्लीम समाजातील सहा व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Misleading Title: भारतरत्न’वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी”
Fact Check By: Amruta Kale 
Result: False