होळिका दहन कार्यक्रमात सहभागी झालेले सीएम योगी यांचा व्हिडिओ तरुण हत्या प्रकरणाशी जोडून व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

होळीच्या दिवशी दिल्लीच्या द्वारका भागातील उत्तम नगर येथे पाण्याचे फुगे फेकण्यावरून वाद झाला. या वादात तरुण खटीक नावाच्या युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली. 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, सीएम योगी तरुण खटीकच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती काळाले की, व्हायरल व्हिडिओ गोरखपूरमधील होलिका दहन कार्यक्रमाचा आहे.

काय आहे दावा ? 

व्हायरल व्हिडिओमध्ये सीएम योगी गोरखपूरचे लोकसभा खासदार रवी किशन यांच्यासोबत चालताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी तरुण भाईंना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी –

रिव्हर्स इमेज सर्च केलेल्यावर कळाले की, हा व्हिडिओ भ्रमक दाव्यसह व्हायरल होत आहे. 

मुळात व्हायरल व्हिडिओ “लोकल न्यूज गोरखपूर” नावाच्या फेसबुक पेजवर 2 मार्च 2026 रोजी शेअर केलेला आढळला.

व्हिडिओच्या कॅप्शननुसार, “गोरखपूरमध्ये होळिका दहन उत्सव समिती पांडेयहाता यांनी काढलेल्या भव्य शोभायात्रेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.”

पुढील शोधात, याच कार्यक्रमाचे फोटो रवी किशन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही 2 मार्च 2026 रोजी शेअर केले होते. 

कॅप्शनमध्येदेखील हे फोटो ‘गोरखपूरमधील होलिका दहन उत्सवाचे’ असल्याचे नमूद केले आहे. 

तसेच हा कार्यक्रमाचा व्हिडिओ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही अपलोड केलेला आढळला.

मुख्यमंत्री योगींचा कार्यक्रमात सहभाग

गोरखपूरच्या पांडेयहाता येथे 99 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार हा होळिका दहन उत्सव साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात सीएम योगी यांनी सहभाग घेतला, नरसिंह भगवान यांची आरती केली होती. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

निष्कर्ष –

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ तरुण खटीक हत्या प्रकरणाशी संबंधित नाही. मुळात हा व्हिडिओ गोरखपूरमधील होळिका दहन कार्यक्रमाचा आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: होळिका दहन कार्यक्रमात सहभागी झालेले सीएम योगी यांचा व्हिडिओ तरुण हत्या प्रकरणाशी जोडून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *