
उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाविरोधात वक्तव्य करत त्यांच्या कारभारची पोलखोल केली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात संजय राऊत भाजप सरकारवर टीका करत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणतात की, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणे हे लोकतंत्र नाही. हे यामुळे होत आहे, कारण आपण सत्तेसाठी कोणत्याही थराला जात आहोत. तुम्ही लपवू नका, जे खर आहे ते समोर आणा, यासाठी आम्ही जबाबदार आहोत. जर हे कोणत्या दुसऱ्या राष्ट्रात झाले असते तर तेथील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता.”
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “राऊतने उबाठाच्या कारभाराची पोलखोल केली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंन विरोध वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु अशी कोणतीही बातमी माध्यमांवर आढळत नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रस्तावाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केलेल्या भाषणातील एका भागाची आहे.
वरील व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, संजय राऊत यांनी व्हायरल क्लिपमध्ये केलेल वक्तव्य भाजप सरकार विरोध होते.
व्हायरल क्लिपमधील वक्तव्य करण्यापूर्वी संजय राऊत 00:36 सेकंदावर भाजप सरकार आणि प्रधानमंत्रीवर टीका करताना म्हणतात की, “ज्या देशाचे लोकतंत्र फ्रॅक्चर असून आयसीयूमध्ये शेवटचा श्वास घेत असेल त्या देशाचे राष्ट्रपती असो किंवा प्रधानमंत्री असो त्यांच्या भाषणाला जणता गंभीर घेणार नाही. हे खुप दुर्भाग्यस्पद आहे. कारण जणतेचे देशाच्या व्यवस्थेवरचा विश्वास संपत चालला. फक्त निवडणुकीचे आयोजन करणे ती जिंकने आणि निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणे हे लोकतंत्र नाही. निवडणुकांमध्ये मोठे-मोठे आश्वासन दिली जातात आणि सत्य लपवण्याच्या गोष्टी होतात. हे यामुळे होत आहे; कारण आपण सत्तेसाठी कोणत्याही थराला जात आहोत.”
पुढे ते महाकुंभचा उल्लेख करत म्हणतात की, “महाकुंभ हे आपल्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्या ठिकाणी झालेल्या दुर्घटने बाबत सर्वांनी मत मांडले. तेथील सरकारने डिजीटल महाकुंभ आयोजन केले जेने करुन सर्वांना सोईस्कर होईल. परंतु, त्या ठिकाणी 20 ते 25 कोटी लोक येतील, लोकांना आमत्रने देण्यात आली आणि तेथील व्यवस्था कोलमडली गेली. महाकुंभला एक राजकीय कार्येक्रम बनवले गेले आहे. जेव्हा चेंगराचेंगरीची घटना झाली, तेव्हा ही एक अफवा असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले होते. या दुर्घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, हा आकडा खरा आहे का ? तुम्ही लपवू नका, जे खर आहे ते समोर आणा. या घटनेसाठी आपण (सर्व) जबाबदार आहोत. जर हे कोणत्या दुसऱ्या राष्ट्रात झाले असते तर तेथील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये संजय राऊत राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव करताना भाजप सरकारवर टीका आणि महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंच्या संख्येवर शंका प्रस्तुत करतात.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:संजय राऊत यांचा भाजपवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered
