मतदार यादीत नाव नसेल तरी देखील मतदान करता येते का ? वाचा सत्य

Partly False राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्हिडिओ एक महिला सांगते की, “मतदार यादीत नाव नसेल तर ओळख पत्र, दोन फोटो आणि 8 क्रमांकाचा फोर्म भरून मतदान करता येते. दुसऱ्याने आपल्या नावावर मतदान केले तर  “टेंडर व्होट” करता येते. जर  मतदान केंद्रावर 14% पेक्षा जास्त टेंडर व्होट झाले असेल तर पुनर्मतदान घेण्यात येते.”

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिती दिशाभुल करणारी असून निवडणूक आयोगाने या दाव्यांचे खंडण केले.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला मतदाना विषयी चार दावे करताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मतदान करायला गेल्यावर आपले मतदार यादीत नाव नाही असे कळल्यावर काय करावे, यासाठी एकवेळ अवश्य व्हिडिओ पहा व त्याप्रमाणे कृती करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खालील सर्व दाव्याची कीव्हर्ड सर्च द्वारे पडताळणी केल्यावर कळाले की, हे सर्व दावे खोटे आहेत.

दावा क्र. 1.

“मतदार यादीत नाव नसेल तर आधार कार्ड दाखवून कलम 49पी अंतर्गत “चॅलेंज व्होट” करु शकतात. तसेच आपले दोन पासपोर्ट साइज फोटो मतदान केंद्रात घेऊन फोर्म क्रमांक 8 भरुन मतदान करु शकतात.”

सत्य –

निवडणूक आचार नियम 1961 वैधानिक नियम आणि आदेशाच्या कलम 35(2) अन्वये नुसार मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. यादीत नाव नसेल तर त्या व्यक्तीला मतदाना दिवशी मतदान करता येणार नाही.

या दाव्यामध्ये कलम 49-पी अंतर्गत निविदा मतदान करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु, निवडणूक आचार नियम 1961 मध्ये ‘49 पी’ या कलमामध्ये ‘चॅलेंज व्होट’ तर ‘निविदा मतदाना’ विषयी महिती दिलेली आहे.

दावा क्र. 2.

“आपल्या नावाने कोणी मतदान केले असेल तर “टेंडर व्होट” अंतर्गत मतदानाचा हक्क बजावता येतो.”

सत्य –

निवडणूक आचार नियम 49-पी कलमा अंतर्गत एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या नावाने जर कोणी मतदान केंद्रावर असा दावा करत असेल की, ज्याचे नाव आधीच यादीत आहे, पण त्याच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीने मतदान केले असेल तर त्या इसमाला नियमित मतदान यंत्राचा वापर करून मतदान करू शकत नाही. त्याऐवजी “निविदायुक्त मतपत्रिका” द्वारे मतदान केले जाते.

दावा क्र. 3.

“कोणत्याही मतदान केंद्रावर 14% पेक्षा जास्त टेंडर व्होटची नोंद झाल्यास, अशा मतदान केंद्रांवर पुनर्मतदान घेण्यात येईल.”

सत्य –

निवडणूक आचार नियम 1961 मध्ये अशी कोणती तरतूद आढळत नाही. परंतु, लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 58 मध्ये पुनर्मतदानाची तरतूद आहे.

द हिंदूच्या बातमीनुसार राजस्थान विधानसभा निवडणूक 2008 मध्ये काँग्रेसचे सी.पी. जोशी हे भाजपचे उमेदवार कल्याण सिंह चौहान यांच्याकडून एका मताने पराभूत झाले होते. तेव्हा जोशींनी उच्च न्यायालयात दावा केला होता की, त्यांना काही मते निविदा मतदानाद्वारे पडली होती. न्यायालयाने फेरमोजणीचे आदेश दिल्यावर दोन्ही उमेदवारांना समान मत पडल्याचे समोर आले होते. त्यानंतर सोडतीद्वारे चौहान यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

दावा क्र. 4.

“मतदार यादीत नाव नसेल तर आपले दोन पासपोर्ट साइज फोटो मतदान केंद्रात घेऊन फोर्म क्रमांक 8 भरुन मतदान करु शकतात.”

सत्य –

निवडणूक आचार नियम 1961 नुसार फॉर्म क्र 8 हा केवळ उमेदवाराला एखादा निवडणूक प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी भराव लागणारा आवश्यक फॉर्म आहे.

तसेच, भारतीय निवडणूक आयोगाने 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर फॉर्म क्र. 6 ची तरतुद केली आहे. हा फोर्म ‘पहिल्यांदा मतदान करणाऱ्या’ आणि ‘दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांसाठी’ आहे.

फॉर्म क्र. 6 सबमिट केल्यावर त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर मतदार फॉर्म क्र. 8 चा वापर शकतो.

फॉर्म क्र. 8 चा वापर नाव, फोटो, वय, लिंग, पत्ता, जन्मतारीख, नातेवाईक नाव, नातेसंबंधाचा प्रकार आणि EPIC क्रमांक इत्यादी बदलण्यासाठी केला जातो.

यावरून स्पष्ट होते की, चौथा दावा अंशत: खरा आहे.

निवडणूक आयोगाचे खंडण

गेल्यावर्षी हाच दावा व्हायरल झाल्यावर निवडणूक आयोगाने 27 डिसेंबर 2023 रोजी ट्विट करत हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये केलेले दावे अंशतः खोटे आहेत. तसेच निवडणूक आयोगाने हे दावे दिशाभून करणारे असल्याचे स्पष्ट केले. भ्रामक दाव्यासह शेअर करण्यात आलेले हा व्हिडिओ निवडणुकीदरम्यान मतदारांची दिशाभूल करू शकतो.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मतदार यादीत नाव नसेल तरी देखील मतदान करता येते का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Partly False