
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.”
या व्हिडिओला अनुसरून दावा केला जात आहे की, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस संपुष्टात येण्याबाबत वक्तव्य केले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात मल्लिकार्जुन खरगे भाजपवर टीका करत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये खरगे भाषणादरम्यान सांगतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसचे अंतिम संस्कार निश्चित केले आहे.” (भाषांतर)
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, मल्लिकार्जुन खरगेंनी 3 मे रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरात केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.
काँग्रसच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
वरील भाषणात मल्लिकार्जुन खरगे 12:03 मिनिटापासून पुढे म्हणतात की, “अहमदाबाद हे एक प्रसिद्ध शहर आहे. या भूमीवर महात्मा गांधीजी, सरदार पटेलजी आणि इतर महान नेत्यांचाही जन्म झाला आणि त्यांनी गुजरातला महान बनवले. गांधीजी, सरदार पटेल, मुराभाई देशाई, बिठ्ठलभाई पटेल आणि सर्व महान नेत्यांनी देशाची उभारणी केली. त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचे तीन अध्यक्ष झाले, ज्यामध्ये सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जी.यू.एन देबर होते. या सगळ्यांनी पक्ष मजबूत केला.”
तसेच ते पुढे सांगतात की, “काँग्रेसचा पाया अहमदाबाद शहरात खूप मजबूत आहे. जो कोणी नष्ट करून शकत नाही आणि कोणीही पक्षाला संपण्याची हिम्मत करू शकत नाही. येथील काही नेता बोलतात की, ‘काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.’ अहमदाबाद हे शहर गांधींचे पवित्र शहर आहे. परंतु, अश्चर्याची गोष्ट आहे की, या भूमीवर अशा ही विचारधारेचे लोक जन्माला आली आहेत, जे गांधींची विचारधारा संपवू इच्छितात. या भूमीवर गांधींनी स्वातंत्र्यासाठी आपल सर्वस्व दिल, त्यांच्याच विचारांना संपवण्याचे विचार भाजपमध्ये केला जातो.”
सदरील वक्तव्य येथे पाहू शकता.
तसेच काँग्रसच्या अधिकृत वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण लिखित स्वरूप उपलब्ध आहे.
खिलील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचा अंत पाहू इच्छिणाऱ्या लोकांवर आणि भाजपवर टिका करत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:Edited Video: अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘काँग्रेस संपली’ म्हणाले नाही
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
