दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी ‘भाजप ईव्हीएम हॅक’ करुन निवडणूक जिंकल्याचे मान्य केले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेखा गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आम्ही ईव्हीएम हॅक केले तर विरोधकांना का वाईट वाटत आहे ?”

दावा केला जात आहे की, “रेखा गुप्ता यांनी भाजपवर ईव्हीएम हॅक करत मत चोरी केल्याचा आरोप मान्य केला आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एनडीटीव्हीची पत्रकार म्हणते की, आपण ईव्हीएम हॅक केल्यामुळे एबीव्हीपी आणि भाजप निवडणूक जिंकत आहेत. तसेच आपल्याला निवडणूक आयोगाचे समर्थन आहे.”

यावर रेखा गुप्ता म्हणतात की, “70 वर्षांपासून ते (काँग्रेस) ईव्हीएम हॅक करत होते तेव्हा त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केले तर त्यांना वाईट वाटत आहे, हे चांगलय आहे.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आम्ही इव्हीएम हॅक केलं – रेखा गुप्ता, दिल्ली मुख्यमंत्री, भाजप नेत्या अखेर तोंडून सत्य बाहेर आलंच!”

आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक (आर्काइव्ह | आर्काइव्ह) पेजवर शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखातीत केलेल्या वक्तव्याचा एक भाग आहे.

एनडीटीव्हीने युट्यूबवर 20 सप्टेंबर रोजी या मुलाखातीचे थेट प्रक्षेपण केले होते.

संपूर्ण मुलाखात पाहिल्यावर लक्षात येते की, रेखा गुप्ता यांनी कोणताही आरोप मान्य केले नाही. उलट त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर ‘ईव्हीएम हॅक’चे आरोप करत लोकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितले.

वरील व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपपूर्वी माध्यम प्रतिनिधी सांगतात की, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणूकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (एबीव्हीपी / भाजपाची विद्यार्थी शाखा) विजय मिळवला आहे.

पुढे, 14:34 मिनिटावर माध्यम प्रतिनिधी म्हणतात की, राहुल गांधी आरोप करत आहेत की, ईव्हीएम हॅक केल्यामुळे भाजपा, एव्हीएपी निवडणुका जिंकत आहेत. तसेच आपल्याला निवडणूक आयोगाचे समर्थन आहे.”

यावर प्रतिउत्तर देताना रेखा गुप्ता म्हणतात की, “70 वर्षांपासून ते (काँग्रेस) ईव्हीएम हॅक करत होते तेव्हा त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केले तर त्यांना वाईट वाटत आहे, हे चांगलय आहे.”

पुढे, त्या काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करताना म्हणतात की, “जेव्हा ते (काँग्रेस) जिंकतात तेव्हा जनतेचा आदेश आणि आम्ही जिंकल्यावर ईव्हीएम हॅक. हे सूत्र कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? राहुल गांधींनी हे कुठे शिकले आहेत, हे कोणी मला सांगू शकेल का? म्हणजे, त्यांना (काँग्रेस / राहुल गांधी) धारणा निर्माण करत देशातील निष्पाप लोकांची दिशाभूल करणे आहे.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कटाक्ष मारत काँग्रेसवर टीका करत होत्या. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी ‘भाजप ईव्हीएम हॅक’ करुन निवडणूक जिंकल्याचे मान्य केले का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *