World Cup 2019 : 16 जूनला ठरल्याप्रमाणे भारत–पाक युद्ध होणारच काय आहे सत्य

False Headline Sports

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार, असे स्पष्ट संकेत ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी दिले आहेत. रिचर्डसन म्हणाले की नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत ,अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील. असे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे.

खाली दिलेल्या लिंकवर हे वृत्त तुम्ही सविस्तर वाचू शकता.
दैनिक लोकसत्ता / आक्राईव्ह लिंक

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील या पोस्टला 4 हजार 700 लाईक्स आहेत. यावर 138 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 69 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

या बातमीच्या शीर्षकाबद्दल मात्र अनेक वाचकांनी लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरच आक्षेप नोंदवलेला आहे.

तथ्य पडताळणी

स्क्रोल डॉट इन या संकेतस्थळानेही वर्ल्ड कप 2019 चे सामने ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे म्हटले आहे. हा सामना होऊ नये, असे मत अनेक भारतीयांनी व्यक्त केले असल्याचेही स्क्रोलने नमूद केले आहे.

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
स्क्रोल डॉट इन / आक्राईव्ह लिंक

इंडिया टूडेच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात वर्ल्ड कपचे सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी म्हटल्याचे नमूद केले आहे.

इंडिया टूडे / आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

लोकसत्ताने 16 जून रोजी भारत पाकिस्तानमध्ये सामना होणार असल्याचे दिलेले वृत्त खरे आहे. या वृत्ताला देण्यात आलेल्या शीर्षकाबद्दल मात्र अनेक वाचकांनी लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरच आक्षेप नोंदवलेला आहे. सामन्याला युध्द म्हणण्यास हा आक्षेप आहे. फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीतही अन्य कोणत्याही संकेतस्थळावर युध्द हा शब्द वापरल्याचे आढळलेले नाही. क्रिकेट सामना किंवा सामना हा शब्द अधिक योग्य ठरला असता.

Avatar

Title:World Cup 2019 : 16 जूनला ठरल्याप्रमाणे भारत–पाक युद्ध होणारच काय आहे सत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False Headline (चुकीचे शीर्षक)