Fact Check : व्होडाफोनची सेवा बंद होणार आहे का?

False सामाजिक

व्होडाफोन ही दुरसंचार सेवा पुरवणारी कंपनी बंद होणार असल्याची माहिती
Maharashtra Today ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / महाराष्ट टुडेचे संग्रहित केलेले वृत्त / Archive

लोकमत या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्राच्या फेसबुक पेजवरही अशा स्वरुपाची पोस्ट दिसून येते. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive / लोकमतचे संग्रहित केलेले वृत्त

तथ्य पडताळणी 

व्होडाफोन भारतात आपली सेवा बंद करणार असल्याचे वृत्त विविध माध्यम संस्थांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिल्याचे आम्हाला दिसून आले. 

vodafone news by marathi media.png

लोकसत्ताच्या संकेतस्थळाने याबाबत दिलेल्या वृत्तात कंपनीने याबाबत कोणताही अधिकृत माहिती दिली नसल्याचे 1 नोव्हेंबर 2019 रोजी स्पष्टपणे म्हटले आहे. हे वृत्त प्रसिध्द होताच व्होडाफोनने विविध प्रसारमाध्यमांना पत्र पाठवत आपण भारतातील आपला व्यवसाय बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले. हे पत्र आपण खाली पाहू शकता. 

Vodafone letter to media.png

विविध प्रसारमाध्यमांनीही याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळानेही हा खुलासा करणारे वृत्त प्रसिध्द केले आहे. 

Mumbai Tarun bharat.png

मुंबई तरुण भारत / Archive

या संशोधनातून ही बाब स्पष्ट होत आहे की, व्होडाफोन इंडियाने आपण भारतातून आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.

निष्कर्ष 

व्होडाफोन इंडियाने आपण भारतातून आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : व्होडाफोनची सेवा बंद होणार आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False