
स्वातंत्र्य लढ्यात आपल्या गालावर गोळी खाताना चाचा नेहरू, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. सुमेध वहने यांनी ही फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्हायरल करण्यात येत असलेले हे छायाचित्र खरे आहे का, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पंडित नेहरुंचे चुंबन असे शब्द टाकून गुगलवर सर्च केले. तेव्हा खालील परिणाम दिसून आला.
यात मिळालेल्या माहितीनुसार त्या नेहरु यांची भाची नयनतारा सेहगल असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही नयनतारा सेहगल यांच्याविषयी अजुन जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्सचा नयनतारा सेहगल यांच्याविषयीचा एक व्हिडिओ दिसून आला. यातही नयनतारा सेहगल यांच्या भाची असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेत नेहरु यांच्याविषयीची विविध छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहिले. त्यावेळी Mr Nehru Arrives At London Airport (1955) या व्हिडिओत 27 व्या सेकंदाला भारतीय संस्कृतीनुसार एका निर्मळ भावनेतुन मामाविषयीचे प्रेम व्यक्त करतानानेहरुच्या भाची नयनतारा सेहगल यांनी त्यांचे चुंबन घेतल्याचे दिसून येते.
फॅक्ट क्रेसेंडो हिंदीनेही नेहरु यांच्या विविध छायाचित्रांचे फॅक्ट चेक केले आहे.
निष्कर्ष
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांना बदनाम करण्यासाठी इंटरनेटवर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ खोटी माहिती टाकून पसरविले जात असल्याचे दिसून येते. नेहरु यांचा हा फोटो त्यांच्या भाचीसोबतचा असून तो चुकीच्या पध्दतीने आणि माहितीद्वारे सोशल मीडियावर फिरवण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीनुसार ही पोस्ट असत्य आढळली आहे.


