राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर कोणतीही टीका केली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला सुप्रिया सुळे यांचा डोक्यावर तुळशी घेऊन वारीत सहभाग घेतानाचा फोटो असून सोबत टीव्ही-9 डिजिटल लोगोसोबत लिहिलेले आहे की, “सुप्रिया सुळेंनी मोडला पवारांचा नियम, मटण खाऊन मंदिरात गेल्याचा शिवसेनेचा आरोप.”

डाव्या बाजूला जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये म्हणतात की, मतदार काय इतका मूर्ख आहे का ? आज मटण खाल्ले, आज बोकड कापला, उद्या ते वारीला जाणार, मग तेथे माळ घालणार, म्हणजे मतदारांना आकलन शक्तीच नाही. ते आपले गुरा-ढोरासारखे आपल्या मागे-मागे येतील, असा आहे का मतदार ?”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनध्ये लिहितात की, “मटण खाऊन वारी आणि मंदिरात जाणाऱ्या सुप्रिया सुळेंना जितेंद्र आव्हाडांकडूनच घरचा आहेर!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर टीव्ही-9 डिजिटलच्या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओमधील जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद 26 जून 2023 रोजी अपलोड केल्याचे आढळले.

व्हिडिओसोबत के. चंद्रशेखर राव यांच्या सोलापूर दौऱ्याबाबत जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया’ असा मथळा होता.

https://youtu.be/1iHQWjZ4MXA?t=29

वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, व्हायरल व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून वक्तव्य केले नाही.

एका महिला पत्रकाराने सांगितले की, बीआरएस पक्षाने वारीला जाण्याच्या एक दिवसापूर्वी मटण पार्टी ठेवली होती, या मुद्यावर अनेक ठिकाणी टीका होत आहे.

या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले की, “मटण खाल्ले आणि वारीत गेले, आशी मत मिळतात का ? मतदार काय इतका मुर्ख आहे का ? आज मटण खाल्ल, आज बोकड कापल, उद्या ते वारीला जाणार, मग तेथे माळ घालणार, म्हणजे मतदारांना आकलन शक्तीच नाही ? ते आपले गुरा ढोरा सारखे आपल्या मागे मागे येतील, असा आहे का मतदार ?”

सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोप

न्यूज-18 लोकमतच्या बातमीनुसार 4 मार्च 2023 रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मटण खाऊन महादेव मंदिरात गेल्याचा आरोप केला होता.

या संबंधित विजय शिवतारे यांनी आपल्या आधकृत फेसबुक पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सुप्रिया सुळे दोन तरुणांशी संवाद साधताना आपण सुद्धा अशीच मटण थाळी खाली असे म्हटले होते. सोबत सुप्रिया सुळे यांच्या अधिकृत फेसबुक अकांउटवर शेअर केलेले मंदिर दर्शनाचे फोटोंचे स्किनशॉटदेखील शेअर केले होते.

https://www.facebook.com/ShivtareVijay/posts/pfbid0Y4GabZs2wh3i6qyTAiDNNMm2LLYGr19E6FYmEhxqBDzZ17QGTUGdtc49QS8jG9rzl?__cft__[0]=AZVfVGE45nutrUC5jcTREbGdfnkAfVxB9joJebq3WqWsFBWUomNAjoTDGzhRdpirHrmTRlLYScitVmf0hETtbbhncPyE5xWB3COdERjBs39A83IiLRQCCSOEhu_rjGLXOdty2313Ybg6-EjCeSfzS5xx&__tn__=%2CO%2CP-R

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून वक्तव्य केले नव्हते. ते बीआरएसपक्षा बद्दल बोलत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading