पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने नोकराला मारहाण केली का? वाचा या व्हिडिओमागील सत्य

False राजकीय | Political

नोकराने पगार मागितला म्हणून उत्तर प्रदेशमधील जौनपुरचे भाजप आमदार विपुल दुबे यांनी नोकराला बेदम मारहाण केली, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला काठीने मारहाण केली जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, मारहाण करणारा ही व्यक्ती जौनपुरचे भाजप आमदार विपुल दुबे नाहीत. 

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बिजनौर येथे भाजपच्या सुची चौधरी आमदार आहेत. यावरून या व्हिडिओच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित होते. 

रिव्हर्स इमेज सर्च करून या व्हिडिओचा शोध घेतला. त्यातून 17 एप्रिल 2022 रोजीची दैनिक भास्करची एक बातमी आढळली. त्यानुसार, उत्तर प्रदेश मधील शाहजहांपुर येथे एका युवकाला काठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

पीडित युवकाचे नाव राजीव भारद्वाज असे आहे. सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत मुख्य आरोपी प्रतीक तिवारीसह तीन जणांवर गुन्हा नोंदविला होता.

ईटीव्ही भारत आणि जागरण वृत्तपत्रातील बातमीतही या व्हिडिओतील व्यक्तीचे नाव प्रतीक तिवारी सांगितलेले आहे. यात कुठेही विपुल दुबे यांचे नाव नाही. 

या व्हिडिओबाबत अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने शहाजहांपुरचे पोलिस अधीक्षक संजय कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितल की, सदरील घटना बिजनौर येथील नसून, शहाजहांपुरचा आहे. तसेच यात भाजपच्या आमदाराने मारहाण केलेली नाही. आरोपी प्रतीक तिवारी आणि पीडित राजीव भारद्वाज यांच्यामध्ये देवाणघेवाण करण्यावरून वाद होता. या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे. 

संजय कुमार यांनी ट्विटद्वारेदेखील या व्हिडिओबाबत माहिती दिली होती. 

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, सदरील व्हिडिओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती भाजप आमदार नाही. यातील आरोपीचे नाव प्रतीक तिवारी आहे.

Avatar

Title:पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने नोकराला मारहाण केली का? वाचा या व्हिडिओमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False