व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा 4 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये दाखल झाली. तेथील जलवार जिल्ह्यातील चावली येथे मोठ्या प्रमाणात लोक यात्रेत सामील झाले. यानंतर सोशल मीडियावर गर्दीचे काही फोटो व्हायरल होऊ लागले. दावा केला जात आहे की, व्हायरल होत असलेले फोटो भारत जोडो यात्रेला जमलेल्या विराट गर्दीचे आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. गर्दीचे हे फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचे नाहीत. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये विशाल गर्दीचे फोटो शेअर करून लिहिलेले आहे की, “राजस्थानच्या झालावाड जिल्ह्याच्या चंवलीमध्ये भारताचे भविष्य राहुल गांधींच्या स्वागतासाठी जमलेली विराट गर्दी.” 

मूळ पोस्ट – फेसबुक 

मूळ पोस्ट – ट्विटर 

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून व्हायरल फोटोपैकी एक फोटो खालील ट्विटमध्ये आढळला. 

ट्विटनुसार, हा फोटो उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील माधवपुरीमधील जयदेवगुरू आश्रमातील एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित गर्दीचा आहे. 

अर्काइव्ह 

अर्काइव्ह

पंकज महाराज संचालित या आश्रमामध्ये 1 ते 5 डिसेंबर 2022 रोजी सत्संग आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवचनासाठी अशी विशाल गर्दी लोटली होती. पंकज महाराज यांनी आपल्या ट्विटरवर 3 डिसेंबर रोजी हे फोटो शेअर केले आहेत. 

वरील ट्विटमधील फोटो आणि व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये बरीच समानता पाहायला मिळते. दोन्ही फोटोमध्ये  दोन्हींची तुलना केल्यावर दिसते की, मंडप, दुकानांची रांग, दूरवरील झाड आणि इमारती एकच आहेत. 

मनोज राजपूत नामक एका युजरने इंस्टाग्रामवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्येसुद्धा विराट गर्दी आणि उजव्या बाजूला मंडप दिसतो. 

फॅक्ट क्रेसेंडोने मनोज राजपूत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून मूळ व्हिडिओ मागविला. त्यांनी स्पष्ट केले की व्हायरल फोटो मथुरा येथील जयदेवगुरू आश्रमातील आहे.

भारत जोडो यात्रा राजस्थान

भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमधून राजस्थानमध्ये 4 डिसेंबर रोजी दाखल झाली. राहुल गांधी आणि भारत जोडो यात्राचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे आले होते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर रॅलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नसून उत्तर प्रदेशमधील जयगुरूदेव आश्रमातील कार्यक्रमाचा आहे. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False