नाशिक वरून मुंबईला इंटरव्ह्यूसाठी गेलेली अश्विनी सोनवणे नामक तरूणी रस्त्यातच बेपत्ता झाली, असा एक मेसेज व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज गेल्यावर्षीचा असून अश्विनी प्रियकराशी विवाह करण्यासाठी गेली होती.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये एका तरूणीचा फोटो दिसतो.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “अश्विनी देविदास सोनवणे,, (वय 25) ही नाशिक वरून इंटरव्ह्यू साठी 15 तारखेला सकाळी 6 वा मुबई नाका बस स्थानकावरून मुबई साठी गेली परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला तरूणीचा फोटो आणि मेसेज गेल्यावर्षीचे आहे.

गिरीश नामक युजरने 18 जून 2023 रोजी हीच पोस्ट ट्विटरवर शेअर केल्यावर त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगण्यात आले की, सदरील तरुणी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलीस स्थानकात हजर झाली असून तिचा शोध थांबण्यात यावा.

सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये अश्विनी सोनवणे नातेपुते पोलीस स्थानकासमोर दिसतात.

https://twitter.com/Mahadev100008/status/1670423640310181895

तसेच नाशिक शहर पोलिसने ट्विट करत स्पष्ट केले की, “नाशिक शहर येथील हरवलेली अश्विनी देविदास सोनवणे नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुखरुप मिळाली आहे. तसेच तिने प्रवीण मच्छिंद्र खिलारे, रा. सोलापूर याच्याशी लग्न केले आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

महानगर वेबसाईटच्या बातमीनुसार अश्विनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. अनेक नेटकऱ्यांनी ती बेपत्ता झाल्याची किंवा तीच अपहरण झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. लव्ह जिहाद पासून ते तस्करी पर्यंत अश्या अनेक प्रकारच्या शंका ही उपस्थित करण्यात आल्या. मात्र, पडताळणीनंतर पोलिसांनी सांगितले की, अश्विनी तिच्या मर्जीनेच प्रियकरला भेटण्यासाठी गेली आणि तिने त्याच्याशी लग्न केले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल हा मेसेज भ्रामक आहे. नाशिक येथील अश्विनी ही तरुणी अचानक हरवली किंवा गायब झाली नव्हती. तर ती स्वतःच प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी गेली होती. भ्रामक दाव्यासह आजही हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अश्विनी सोनवणे बेपत्ता नसून ती प्रियकराशी लग्न करण्यासाठी गेली होती; जुना मेसेज व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Partly False