बिबट्याचा तो व्हिडिओ पुण्यातील नाही, कर्नाटकचा व्हिडिओ इकडे व्हायरल; वाचा सत्य

पुण्याच्या भोसरी भागातील संत तुकाराम नगरमध्ये एका रस्त्यावर बिबट्या दिसला, या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ही क्लिप पुण्याची नसून ती कर्नाटकमधील आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे. काय आहे […]

Continue Reading

Hijab Row: कर्नाटकामध्ये विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत तिरंगा काढून भगवा झेंडा फडकावला का?

कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून उफाळलेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. कर्नाटकमधील अनेक शहरांमध्ये तर या वादाला हिंसक वळण लागून दगडफेकसुद्धा झाली. अशातच कॉलेजमधील खांबावर चढून भगवा झेंडा फडकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे, की कर्नाटकमधील शिमोगा शहरातील कॉलेजमध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत राष्ट्रीय ध्वजाला काढून […]

Continue Reading

भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? 43 […]

Continue Reading

सांगलीत महापुरामुळे किंग कोब्रा आलेला नाही. हा व्हिडियो कर्नाटकमधील आहे. वाचा सत्य

सांगली जिल्ह्यामध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर आता जीवनमान पूर्वपदावर येत असताना रोगराईसह इतर अनेक समस्यांचे आव्हान आहे. यातच भर म्हणून अफवा पसरतेय की, सांगलीत पुरामुळे किंग कोब्रासारखे विषारी साप आले आहेत. टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिनीने तर सांगलीतील एका घरात सापडलेला किंग कोब्रा पकडण्याचा व्हिडियोदेखील शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. मूळ […]

Continue Reading