सध्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप मिसळले जात असल्याचा वाद सुरू आहे. यामुळे मंदिराला तूप पुरवठा करणारी ए. आर. फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सोशल मीडियावर याच नावाच्या एका कंपनीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांची नावे शेअर करून दावा केला जात आहे की, मुस्लिम संचालक मंडळ असणारी कंपनी तिरुपती मंदिरात प्रसादासाठी तूप देत होती.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमधील कंपनी पाकिस्तानमध्येस्थित असून ती तिरुपती बालाजी मंदिरासाठी तूप पुरवत नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये ए. आर. फूड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याची प्रोफाईल दाखवली आहे. स्क्रीनशॉटमधील सर्व नावे मुस्लिम आहेत.

युजर्स हा स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नाव आणि लाज या लोकांना ज्यांना तिरुपती मंदिराचा प्रसाद बनवण्याचा ठेका मिळाला आहे, ही नावे बघून प्रसादामध्ये गोमांस चरबी आणि इतर मांसाहारी घटक मिसळलेले आढळले आणि तिरुपती मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांनी हा प्रसाद खाल्ला यात आश्चर्य नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर 20 सप्टेंबर 2024 रोजी न्यूज18 वर प्रसिद्ध झालेले वृत्त आढळले. ज्यामध्ये तिरुपती मंदिराला तूप पुरवठा करणाऱ्या एका कंपनीचे नाव नमूद केले होते.

या कंपनीचे नाव "राज मिल्क - एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड" असून ती तामिळनाडूच्या दिंडीगुल शहरात स्थित आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव राजशेखरन राजू आहे.

मूळ पोस्ट – न्यूज18 | आर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर राज मिल्क – ए.आर. डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वेबसाइट सापडली.

या वेबसाईटनुसार कंपनीची स्थापना 1995 मध्ये झाली असून संचालक राजसेकरन राजू, सुरिया प्रभा आर आणि श्रीनिवासन एस आर. आहेत.

पुढे अधिक सर्च केल्यावर कळाले की, "भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस जारी केली.

या नोटीसनुसार एआर डेअरीच्या चाचणीसाठी पाठवलेला नमुना पॅरामीटर्स पूर्ण करण्यात अयशस्वी झाला आहे. अधिक माहिती येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – एएनआय

मग व्हायरल स्क्रिनशॉर्ट कुठला ?

कीव्हर्ड सर्च केल्यावर "रॉकेट सर्च" या वेबसाईटवर व्हायरल स्क्रीनशॉटमधील कंपनी आणि कर्मचाऱ्याची माहिती आढळली. वेबसाइटनुसार ही कंपनी इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये आहे.

या ठिकाणी कंपनीच्या तपशीलमध्ये लिहिले आहे की, ही कंपनी पॅक केलेले मसाले, स्नॅक्स आणि इंस्टट फूड संदर्भात काम करते.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या प्रोफाल खालील ठिकाण हटवून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल स्क्रिनशॉर्टमधील दाखलेली नावे तिरुपती मंदिराला तूप पुरवठा करणारी राज मिल्क ए आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नाही. ही नावे इस्लामाबाद, पाकिस्तान येथे स्थित ए आर फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आहे. खोट्या दाव्यासह हा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim Review :   या स्क्रिनशॉर्टमध्ये तिरुपती मंदिराच्या प्रसादासाठी तुप पुरवठा करणाऱ्या ए आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांचे नावे दाखली आहे. ज्यांनी कथित रित्या प्राण्यांची चरबी असलेले तूप मंदिराला पुरवले होता. ही कंपनी मुस्लिम चालवतात.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE