Fact : शुजा सय्यदचे दावे निवडणुक आयोगाने ठरवलेत असत्य

False राजकीय | Political

हा सुजा सय्यद आहे. हा जगातला EVM हँक मास्टर आहे. 2014 ला भाजप ने या हॅकरचा आणि त्याच्या पूर्ण 14 जणांच्या टिम चा उपयोग करुन निवडणुका जिंकल्या होत्या, असा दावा असलेली माहिती Gaurav Sawant यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. टिममधील 14 जणांपैकी 13 जणांना मारून टाकले आहे. तो एकटा या हल्ल्यातून वाचून अमेरिकेला पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. आज रोजी तो भाजप विरोधात आहे. हा 2019 चा महाराष्ट्र विधानसभेचा जो खरा फाईल निकाल सांगतोय तो बघा, असा दावाही या पोस्टमध्ये आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी 

शुजा सय्यद कोण आहे आणि भाजपने 2014 ला खरोखरच भाजप ने या हॅकरचा आणि त्याच्या पूर्ण 14 जणांच्या टिम चा उपयोग करुन निवडणुका जिंकल्या होत्या का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हा आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने 21 जानेवारी 2019 ला म्हणजेच लोकसभा निवडणुकीपुर्वी दिलेले खालील वृत्त दिसून आले. 

AAJTAK | ARCHIVE

NEWS18 | ARCHIVE

शुजा सय्यदने लंडन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला चेहरा झाकला होता. त्यामुळे सुजा सय्यद ही व्यक्ती नेमकी कोण आहे? कशी दिसते, हे सांगता येत नाही. द लंलनटॉपने याबाबत केलेल्या एका व्हिडिओत आपण वेगवेगळे दावे करण्यात आल्याचे आपण पाहू शकता.  सय्यद शुजाचे अनेक दावे असत्य असल्याचे व ते भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी खोडल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. मतदान यंत्र बनविणाऱ्या ECIL नेही तो आपला आजी अथवा माजी कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

न्यूजलॉन्डी या इंग्रजी संकेतस्थळानेही सुजा सय्यदने केलेले अनेक दाव्यांचे फॅक्ट चेक केले. त्यांचे अनेक दावे असत्य असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. शुजा सय्यदने ईव्हीएम हॅकिंगचा दावा केला असला तरी त्याच्या सत्यतेबाबत निवडणूक आयोगाने अथवा भारत सरकारने काय म्हटलंय याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आम्हाला एनडीटीव्हीचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात निवडणूक आयोगाचे तांत्रिक विषयातील तज्ञ डॉ. रजत मूना यांनी सुजा सय्यद याचा हा दावा फेटाळून लावल्याचे म्हटले आहे. सय्यद याचा हा दावा तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या उपकरणाद्वारे ईव्हीएम हॅक करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

NDTV | ARCHIVE

निवडणूक आयोगाने या प्रकरणी तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याबाबत गुन्हा केल्याचे वृत्त इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने दिल्याचे आपण खाली पाहू शकता. 

या प्रकरणी ईव्हीएम बनविणारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने स्पष्टीकरण देताना या मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

LIVE HINDUSTAN | ARCHIVE

या संशोधनातून हे स्पष्ट होत आहे की, शुजा सय्यदने कोणताही पुरावा न देता हे आरोप केल्याने भारतीय निवडणूक आयोगाने हे दावे फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी शुजा सय्यद याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

निष्कर्ष 

शुजा सय्यदने कोणताही पुरावा न देता हे आरोप केल्याने भारतीय निवडणूक आयोगाने हे दावे फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी शुजा सय्यद याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती सय्यद शुजाच आहे, असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : शुजा सय्यदचे दावे निवडणुक आयोगाने ठरवलेत असत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False