
पॅराशुटद्वारे जमिनीवर उतरताना एका पॅराट्रुपरची भांबेरी उडाल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो पाकिस्तानी सैनिकाचा असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडियो सुमारे आठ वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असून, तो रशियाचा आहे.
काय आहे दावा?
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी ebaumsworld या संकेतस्थळावर 20 फेब्रुवारी 2015 रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आल्याचे आढळले. हा व्हिडिओ कुठला आहे याची कोणतीही माहिती मात्र याठिकाणी दिसून आली नाही.
अधिक शोध घेतल्यानंतर irishmanabroad (संग्रहित) या संकेतस्थळावर हा व्हिडिओ रशियातील असल्याचे म्हटले आहे. Gfycat (संग्रहित) या संकेतस्थळावरही 07 जुलै 2014 रोजी हा व्हिडिओ रशियन सैनिकाचा असल्याचे म्हटले आहे. military.com या संकेतस्थळानेही हा व्हिडिओ रशियातील असल्याचे नमूद केले आहे.
युटूयूबवरही हा व्हिडिओ 25 सप्टेंबर 2012 रोजी अपलोड करण्यात आलेला दिसून आला. याठिकाणीही तो रशियातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ पाकिस्तानी सैनिकाचा नाही. तो रशियातील सैनिकाचा आहे.

Title:रशियातील पॅराशूटचा व्हिडिओ पाकिस्तानचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
