
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी कमी उंची असलेल्या एका महिलेला झुकून प्रणाम केला. या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
या फोटोसोबत आता दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी ज्या महिलेच्या पाया पडले त्या आयएएस अधिकारी आरती डोगरा होत्या.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, या फोटोतील ही महिला IAS आरती डोगरा नाहीत.
काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेस सर्च केल्यावर ‘अमर उजाला’ने 16 डिसेंबर रोजी प्रकाशित केलेली बातमी आढळली. या बातमीनुसार, काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळ्यात शिखा रस्तोगी नामक एक दिव्यांग महिला मोदींना भेटण्यासाठी आली होती. ती महिला पंतप्रधानांच्या पाया पडत असताना मोदींनी तिला थांबविले आणि स्वतःच तिच्या पाया पडले.

मूळ बातमी – अमर उजाला । अर्काइव्ह
कोण आहेत शिखा रस्तोगी?
शिखा रस्तोगी (40) या वाराणसीच्या सिग्रा भागातील रहिवासी आहेत. जन्मतः दिव्यांग असलेल्या शिखा नृत्याची शिकवणीसुद्धा घेताता. तसेच घरूनच शिलाईचेसुद्धा काम करतात.
झी बिहार झारखंड या युट्यूब चॅनेलवर या प्रकरणाविषयी सविस्तर बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे.
यानंतर फॅक्ट क्रेसेंडो ने IAS आरती डोगरा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, “या फोटोसोबत केला जाणारा दावा चुकीचा आहे. पंतप्रधान पाया पडले ती महिला मी नाही. मी राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे वाराणसीमध्ये मी असण्याचा प्रश्नच नाही.”
कोण आहेत आरती डोगरा?
उत्तराखंडमधील आरती यांनी 2006 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली होती. त्यांची उंची सुमारे साडेतीन फूट आहे. बिकानेर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहाताना ‘बंको बिकाणो’ या अभियानाची सुरूवात केली. या अभिनाअंर्तरगत आरती यांनी लोकांना उघड्यावर शौचलायस बसण्यास बंदी घातली आणि शौचालयाची निर्मीती केली. या कामामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरती यांची स्तुती केली आहे, असे लोकसत्ताने रिपोर्ट केले आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, या फोटोत नरेंद्र मोदी यांनी IAS आरती डोगरा यांचा आशीर्वाद घेतला नव्हता. या फोटोतील महिलेचे नाव शिखा रस्तोगी आहे. त्यामुळे ही पोस्ट अर्धसत्य आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:‘या’ फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी IAS आरती डोगरा यांच्या पाया पडले नव्हते; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Partly False
